Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedक्वॉरंटाईन असलेले 5 जण पिंपळनेरातून झाले पसार

क्वॉरंटाईन असलेले 5 जण पिंपळनेरातून झाले पसार

पिंपळनेर  – 

येथे गेल्या 22 दिवसांपासून क्वारंटाईन असलेल्या राजस्थानमधील पाच जण आज सकाळी पोलीसांना चकमा देवून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. उमरपाटा येथील मंडळाधिकारी आर.एल. पवार यांनी पंचनामा करुन पुढील तपासासाठी पिंपळनेर पोलिसात अर्ज दिला आहे.

- Advertisement -

हैद्राबाद जुन्नर येथून दि. 30 मार्च रोजी राजस्थान बाडमेरकडे जाणार्‍या 55 जणांना शेलबारी घाटात पकडण्यात आले होते. त्यांना अपर तहसिलदार व पोलिसांनी क्वारंटाईन करून वाणी मंगल कार्यालय येथे व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्यातील पाच जणांनी आज पोलीस व मंडळ अधिकार्‍यांना चकमा देत पलायन केले.

त्यांच्या विरोधात उमरपाटा मंडळ अधिकारी आर. एल. पवार यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधीतांवर गुन्हा दाखल करून तपास व्हावा अशी मागणी केली आहे.

पलायन करणार्‍यांमध्ये राणाराम सोतामजी प्रजाप्रती (रा. लोहाडी जि. बाडमेर), रमेशकुमार केसाराम प्रजापती (मु. सजाडा जि. बाडमेर), रमेश शंकरराम प्रजापती (रा. लोहाडी जि. बाडमेर), जगाराम गिरधारीलाल (रा. लोहाडी) व मुकेश गोरखा रामजी प्रजापती (मु. गालानंडी जि. बाडमेर) यांचा समावशे आहे. त्यांच्याविरोधात पिंपळनेर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या