Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेरकरांची चिंता वाढली, 4 पॉझिटिव्ह

संगमनेरकरांची चिंता वाढली, 4 पॉझिटिव्ह

जामखेडमध्येही आणखी एकाला बाधा । 7 मे पर्यंत हॉटस्पॉट वाढविला

अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरूवारी एकाच दिवशी जिल्ह्यातून पाच जणांचे करोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या 14 व्यक्तींपैकी चौघांचा गुरूवारी दुपारी, तर रात्री जामखेड मधील एका व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधीतांची संख्या आता 38 वर पोहचली आहे. यामुळे जिल्ह्यातील संगमनेर आणि जामखेड हा करोनाचा केंद्रबिंदू होऊ पाहत आहे.

- Advertisement -

चार एप्रिल रोजी 14 नेपाळी व्यक्तींना संगमनेरमधील एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, 14 दिवसानंतर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, या सर्व व्यक्तींना संगमनेर येथे संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. या सर्वांचे 14 दिवसानंतरची देखरेखीचा कालावधी बुधवारी संपणार होता. यामुळे त्यांचा स्त्राव पुण्याच्या लष्कराच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आला होते. त्याचा अहवाल गुरूवारी दुपारी आला. यात 10 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह तर चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते.

तसेच बुधवारी रात्री जामखेड येथील दोघा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्णाची दोन्ही मुले करोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आले असता त्यातील या एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. यामुळे गुरूवारी एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाचने वाढली आहे. दुपारी संगमनेर येथील चार व्यक्ती आणि रात्री जामखेड येथील एक व्यक्त पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

बुधवारी रात्री जामखेडमध्ये दोन तर गुरूवारी दुपारी संगमनेरमध्ये चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या दोन्ही ठिकाणच्या हॉट स्पॉटमध्ये वाढ केली आहे. यात संगमनेर शहरातील काही भागात 14 दिवस म्हणजेच 7 मे पर्यंत तर जामखेड शहरात 6 मे पर्यंत हॉटस्पॉट लागू राहणार असून या ठिकाणी सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार असल्यातरी आवश्यक असणार्‍या अन्य सेवा या स्थानिक प्रशासनाकडून सुरू राहणार आहेत.

संगमनेर शहरातील रहेमत नगर, जमजम कॉलनी, भारतनगर, अलका नगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती, उम्मद नगर, एकतानगर, शिंदेनगर नाईकवाडापुरा हा भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या परिघात 2 किलो मीटरचा परिसर कोअर एरिया राहणार आहे. 23 एप्रिलला संगमनेर शहरातील या भागात चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक 7 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री हे 7 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागिूकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, संगमनेर हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

तसेच जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात 2 किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित आहे. 22 एप्रिल रोजी जामखेड शहरात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक 6 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणार्‍या दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी बाबी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पूरविण्यात येणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी, कर्जत हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

बाधितांना बुथ हॉस्पिटला हलविणार
करोना बाधीत रुग्णाची जिल्ह्यातील संख्या आता 38 झाली आहे तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 20 झाली आहे. सध्या बूथ हॉस्पीटल मध्ये 11 जण उपचार घेत आहेत. त्यात संगमनेरच्या चौघे आणि जामखेडचा एक बाधीत या सर्व रुग्णांना तिथे हलवले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या