Monday, May 6, 2024
Homeनगरशेवगाव : लॉक डाऊनच्या काळात वाघोलीच्या ग्रामस्थांनी केले शाळेत श्रमदान

शेवगाव : लॉक डाऊनच्या काळात वाघोलीच्या ग्रामस्थांनी केले शाळेत श्रमदान

 शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे सध्या अनेकांना घरीच थांबावे लागत असल्याने वेळ कसा घालावा असा प्रश्न अनेकांसमोर उभा आहे ?  शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांनी या वेळेचा सदुपयोग करुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रमदान केले.  शाळेच्या खुललेल्या परिसरातील वृक्षांची आखीव – रेखीव  छाटणी  करून सौंदर्यात भर घातली आहे. हे सौंदर्य जवळुन जाणाऱ्या – येणाऱ्यांच्या नजरांना जणुकाय खुणावत आहे.
सध्या ध्यास घेतलेले कार्यकर्ते समाजात तसे कमीच म्हणावे लागतील. अन्यथा पद्ममश्री पोपटराव पवार यांच्या विकास वाटेने जाऊन आपल्या स्वतः च्या गावांचा आणखी अनेकांनी सर्वांगीण विकास केला असता. असाच ध्यास  वाघोली गावात विकास कामांना सुरूवात केलेली आहे. प्राथमिक शाळेचे सुशोभिकरण, शेतीसाठी जलसंधारणाची कामे, संगणक शिक्षणाची मोफत सोय भालसिंग विविध संस्थांच्या मदतीतुन करत आहेत. ग्रामस्थांच्या सकारात्मक  सहकार्यामुळे हे त्यांना शक्य होत आहे. श्रमदानाचे महत्व येथील नागरिकांना समजले असुन अनेक कामे या द्वारे केली आहेत.
तीन दिवस चाललेल्या या श्रमदानासाठी त्यांनी गावातील सहकाऱ्यांना बोलावले. ग्रामस्थही आले व कामही फत्ते झाले . हे श्रमदान करतांना सोशल डिस्टनसिंगचे व नियमांचे पालन काटेकोर पालन केले आहे. शाळेतील दुरंडा, फायकस या झाडांची आकर्षक छाटणी केली आहे. सर्वांनी मिळून शाळेतील बागेत झालेले गवत काढले. झाडांच्या आळ्यांची खोदाई करून आळे तयार केले. कंपाउंडवर आलेली काट्यांची तोडणी केली. झाडांना पाणी घातले. उन्हाळ्यातही शाळेचा परिसर हिरवागार दिसत आहे. मंखलराव पांढरे यांनी सर्व झाडांना ७०० लिटर जीवामृत उपलब्ध करुन दिले.
- Advertisment -

ताज्या बातम्या