Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशकरोना : देशात गेल्या 14 दिवसांत 80 जिल्ह्यांत नवा रुग्ण नाही –...

करोना : देशात गेल्या 14 दिवसांत 80 जिल्ह्यांत नवा रुग्ण नाही – आरोग्य मंत्रालय

सार्वमत

नवी दिल्ली – देशात गेल्या 14 दिवसांत देशातील 80 जिल्ह्यांमध्ये करोना व्हायरसचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली.

- Advertisement -

देशातील करोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाकडून नियमितपणे माहिती दिली जाते. शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, करोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी 23,077 वर पोहचलीय तर आत्तापर्यंत देशातील 718 जणांनी आपले प्राण कोविड 19 मुळे गमावले आहेत. देशातील 4749 जणांवर उपचार यशस्वी ठरल्याचीही माहिती देण्यात आलीय.

देशातील वेगवेगळ्या ठिकाणी 17,810 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 1684 नवीन करोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलीय. गेल्या 28 दिवसांत 15 जिल्ह्यांतून कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही. देशाचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 20.57 टक्के असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

तर गृहमंत्रालयानं शुक्रवारी चार अतिरिक्त आंतर-मंत्रालय टीम गठीत केल्यात. या अगोदर केंद्राकडून 6 टीम्स गठीत करण्यात आल्या होत्या. या प्रत्येक टीमचं नेतृत्व अतिरिक्त सचिव स्तराच्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आलंय. अहमदाबाद, सूरत, हैदराबाद आणि चेन्नईसाठी या टीम गठीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिलीय.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजीत सिंह म्हणाले, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता 9 दिवसांवर पोहचलाय. त्यामुळे, करोनावर नियंत्रण मिळवण्यात आपण यशस्वी ठरतोय, हे लक्षात येेते.

- Advertisment -

ताज्या बातम्या