Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहिंद्रासह मोठ्या उद्योगांच्या सुरू होण्याने उद्योग नगरीत चैतन्य

महिंद्रासह मोठ्या उद्योगांच्या सुरू होण्याने उद्योग नगरीत चैतन्य

सातपूर : नाशिकच्या उद्योग नगरीला पुन्हा एकदा गती मिळाली असून औद्योगिक क्षेत्राची मुख्य वाहिनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा उद्योगाने पंधराशे सेवकांची परवानगी घेतलेली असल्याने येणाऱ्या काळात निश्चितपणे उत्पादन प्रक्रिया गतिमान होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लघु व मध्यम उद्योगांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार व त्यांनी घालून दिलेल्या निर्बंधांचे अनुसार औद्योगिक क्षेत्राला उत्पादन प्रक्रिया सुरू करण्याला परवानगी देण्यात आली होती. पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील तीन हजार उद्योगांनी अर्ज दाखल केले होते तर सोळाशे उद्योगांनी उत्पादन प्रक्रियाही सुरू केली आहे.

- Advertisement -

नाशिक औद्योगिक क्षेत्राची जीवनदायिनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी वर आधारित अडीचशे ते तीनशे छोटे मध्यम उद्योग आहेत. महिंद्रा कंपनीचे उत्पादन प्रक्रिया सुरू झाले असेल या उद्योगांनाही ही उत्पादन करण्याला गती मिळणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात निश्चितपणे नवसंजीवनी प्राप्त झाल्याचे चित्र आहे.

महिंद्रा पाठोपाठ हे एबीबी या उद्योगाने उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. एबीबी कंपनीचे ही मोठ्या प्रमाणात पुरवठादार व सुटे भाग बनवणारे छोटे उद्योग मोठ्या संख्येने आहेत त्या उद्योगांनाही एबीबी कंपनी सुरू होण्यामुळे मोठा आधार निर्माण होणार आहे. त्यामुळे एक मोठा उद्योग कार्यरत होणे म्हणजे उद्योगक्षेत्राला गती मिळणे हेच आहे.

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात नकोस सिएट, सिमेंस, रिलायबल ऑटो, सॅमसोनाईट टायसन ग्रुप यासारख्या मोठ्या उद्योगांनी उत्पादन प्रक्रिया सुरू केल्यामुळे लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला करो ना लॉक डाऊन च्या काळात नवसंजीवनी प्राप्त होणार आहे.

उत्पादना अभावी लघु मध्यम उद्योगक्षेत्र मोठ्या अडचणींना सामोरे जात आहे. उद्योग सुरू होण्यातून निश्चितच त्यांच्या समस्यांना उतार पडेल असा विश्वास लघुउद्योग क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या