Monday, May 6, 2024
HomeनाशिकVideo : नाशकात सोशल डिस्टन्सीचे पालन करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा

Video : नाशकात सोशल डिस्टन्सीचे पालन करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकला शासकीय ध्वजारोहण

नाशिक | महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज १ मे २०२० रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावर ठेवत कमीत कमी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नागरे-पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे,पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अरविंद अतुर्लीकर, तहसीलदार पंकज पवार, रचना पवार उपस्थित होते.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंचे पालन करून ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाला हरविण्याचा संदेश देण्यात आला. पालकमंत्री यांनी नागरिकांना सुरक्षित वावर ठेवण्याचे आवाहन करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या