Monday, May 6, 2024
Homeनाशिकआयमातर्फे भविष्य निर्वाह निधीच्या प्रश्नावर वेबिनार द्वारे आयुक्तांशी ‘झूम’ चर्चासत्र

आयमातर्फे भविष्य निर्वाह निधीच्या प्रश्नावर वेबिनार द्वारे आयुक्तांशी ‘झूम’ चर्चासत्र

सातपूर । प्रतिनिधी

भविष्य निर्वाह निधीच्या नवनवीन योजनांचा लाभ उद्योजकांपर्यंत पोहोचावा व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी या उद्देशाने आयमाने वेबिनार द्वारे आयुक्तांशी ‘झूम’ चर्चासत्रातून थेट संवाद साधला यावेळी ३०० हून जास्त उद्योजक सहभागी झाले होते.

- Advertisement -

आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या पुढाकाराने झूम चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने उद्योगांसाठी नवीन योजना कार्यान्वित केल्या आहेत त्या लागू करण्यामध्ये उद्योजकांना येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांचे थेट संवाद भविष्य निर्वाह निधी आयुक्तांशी घडवून आणण्यासाठी या वेबिनारचे आयोजन केले असल्याचे निखिल पांचाळ यांनी सांगितले.

या चर्चेत भविष्यनिर्वाह निधी क्षेत्रीय आयुक्त आयुक्त(ग्रेड-१) एम एम अशरफ, भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय आयुक्त अनुपालक (ग्रेड-२) अभिषेक भरद्वाज तत्र विभाग प्रमुख सतीश कुमार यांनी सहभाग घेत उद्योजकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

या चर्चेत प्रमुख्याने भविष्य निर्वाह निधी मार्च एप्रिल मे या तीन महिन्यांचे मालक व कामगार या दोघांचीही ही भाग स्वतः भरण्याचा निर्णय जाहीर केला आहे मात्र त्यासाठी १०० हून कमी कामगार असलेल्या कारखान्यांची अट टाकलेली आहे ही मर्यादा शिथिल करावी अशी मागणी उद्योजकांनी केली होती त्याचप्रमाणे पंधरा हजारापेक्षा कमी वेतन असलेल्या कामगारांना याचा लाभ मिळणार आहे किमान वेतन मर्यादा पाहता १५००० ही मर्यादा अयोग्य असल्याचे सांगून ही मर्यादा वाढवण्याची मागणी उद्योजकांनी केली त्यासोबतच प्रलंबित असलेले भविष्य निर्वाह निधी विना अडचण करण्यासाठी सवलत द्यावी अशा मागण्या उद्योजकांनी उपस्थित केल्या.

उद्योजकांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन मदत करेल असे आश्वासन देताना श्री अशरफ यांनी आपल्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व सवलतीतातडीने देणार असल्याचे सांगितले त्यासोबतच उद्योजकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निर्णय हे केंद्रीय स्तरावर होणार असल्याने आपण निवेदन दिल्यास ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची आश्वासन दिले.

वेबिनारच्या शेवटी आयमा अध्यक्ष वरूण तलवार यांनी चर्चेचा समारोप करत आयमाच्या वतीने निवेदन देणार असून त्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत आयुक्तांना मागणी केली या चर्चासत्रात तीनशेहून जास्त लोकांनी सहभाग घेतला होता

नाशिक विभागात ५०९३ उद्योग शासनाच्या नव्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत आतापर्यंत त्यातील फक्त  २००० उद्योगांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे इतर उद्योगांनी तातडीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाशी संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी कार्यालय सोडवण्यात येतील
-एम एम अशरफ क्षेत्रीय आयुक्त भविष्य निर्वाह निधी  

- Advertisment -

ताज्या बातम्या