Sunday, May 19, 2024
Homeनाशिकधक्कादायक : मालेगाव तालुक्यातील दाभाडीत ७ करोना बाधित रुग्ण आढळले

धक्कादायक : मालेगाव तालुक्यातील दाभाडीत ७ करोना बाधित रुग्ण आढळले

मालेगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ५६ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी काही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून जवळपास ७ जणांचे अहवाल बाधित आढळून आले आहे. आज मालेगावमध्ये रात्री उशीरा ७१ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६४ निगेटिव्ह तर ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सर्व रुग्ण दाभाडी परिसरातीलच आहेत.

- Advertisement -

आज आढळून आलेल्या रुग्णांमुळे मालेगावमधील रुग्णसंख्या ३४२ वर पोहोचली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३८२ वर पोहोचली. जिल्ह्यात आतापर्यंत २५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर १२ रुग्ण दगावले आहेत.

आज दिवसभरात आलेल्या चार अहवालात १८५ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला.  मात्र दिवसभरात १६ अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामुळे मालेगाव येथील रुग्णांची संख्या ३४२ वर पोहोचली आहे.

आज आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाच महिला असून यात एका २१ वर्षीय तरुणीची समावेश आहे. तर एक १५ वर्षीय मुलगा आणि एक ३४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. सर्व राहणार दाभाडी या गावातीलच असून दाभाडीत काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या डॉक्टरच्या संपर्कातील हे सर्व बाधित रुग्ण असल्याचे समजते.

जिल्ह्यातील नाशिक मनपा परिक्षेत्रात १७ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत ०३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दुसरीकडे नाशिक आणि मालेगाव ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या वाढली असून ती १७ = वर पोहोचली आहे. यामध्ये दोघे करोना मुक्त झाले आहेत

मालेगाव महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ३१ रुग्ण बाधित आढळून आले असून त्यांच्यातील २० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर १२ करोनाबाधित रुग्ण दगावले आहेत.  नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णांची संख्या  ६ वर पोहोचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या