Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशनॅशनल हेरॉल्ड इमारतीचा काही हिस्सा ईडीने केला जप्त

नॅशनल हेरॉल्ड इमारतीचा काही हिस्सा ईडीने केला जप्त

सार्वमत

नवी दिल्ली – काँग्रेसचे नियंत्रण असलेल्या आणि नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणार्‍या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या (एजेएल) विरोधातील बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात् ईडीने कारवाई केली. मुंबईतील टोनी बांद्रे येथील एका नऊ मजली इमारतीचा काही हिस्सा ईडीने जप्त केला आहे. या संपत्तीची किंमत 16.38 कोटी रुपये आहे.
बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये या संपत्तीचा काही भाग जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि एजेएल मुख्य व्यवस्थापकीय संचालक मोतीलाल व्होरा यांना नोटिस बजावली, अशी माहिती तपास यंत्रणेने दिली.

- Advertisement -

गांधी कुटुंबातील सदस्यांसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे एजेएलवर नियंत्रण आहे. या समूहाद्वारे नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र चालवले जाते. या नऊ मजली इमारतीत दोन तळमजले आहेत, तसेच याचे बांधकाम 15 हजार चौरस मीटरचे आहे. या इमारतीचे एकूण मूल्य 120 कोटी रुपये आहे. ही इमारत वांद्रे येथील कलानगरमध्ये आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंहहुडा आणि मोतीलाल व्होरा यांनी एजेएलला बेकायदेशीररीत्या प्लॉट आवंटित केला.

नंतर या प्लॉटवर दिल्लीतील बहादूरशहा जफर मार्गावर असलेल्या सिंडीकेटबँकेचे कर्ज घेतले आणि या पैशांतून बांद्रे येथे इमारत उभारली, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. गुन्हेगारीच्या उत्पन्नातून उभारण्यात आलेली ही 16.38 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली. हरयाणातील तत्कालीन सरकारने 1982 साली पंचकुला येथील प्लॉट एजेएलला आवंटित केला होता. हा प्लॉट देखील ईडीने जप्त केला असून, या प्रकरण हुडा आणि वोहरा यांची चौकशी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या