Thursday, May 2, 2024
Homeनगरकरोनाग्रस्तांवर बीसीजीची चाचणी घेण्यासाठी ससून रुग्णालयाला मान्यता

करोनाग्रस्तांवर बीसीजीची चाचणी घेण्यासाठी ससून रुग्णालयाला मान्यता

पुणे (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बीसीजी लसीची पहिली चाचणी घेण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयाला याबाबतची मान्यता मिळाली आहे. बीसीजी लस कोविड 19 च्या उपचारात काय भूमिका बजावते याबाबत संशोधन सुरु आहे, त्यासाठीचं ही चाचणी घेण्यात येणाAर आहे. मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या 60 रुग्णांची या प्रयोगासाठी निवड करण्यात आली असून, त्यातील दोघा रुग्णांना इंजेक्शनद्वारे लस देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने या प्रयोगातील निरीक्षणांची नोंद घेतली जाणार आहे. राज्यातील करोनाबाधितांवरील बीसीजी लशीचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. लहान बालकाला दिल्या जाणार्‍या मबीसीजीफ लशीचा प्रयोग करोनाबाधितावर करण्यासाठी हाफकिन संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयातील बाधित रुग्णांवर प्रयोगास सुरुवात झाली आहे.

क्षयरोग प्रतिबंधक लस (बीसीजी) ही लस प्रामुख्याने क्षयरोगा (टीबी) साठी वापरली जाते. ज्या देशात क्षयरोग किंवा कुष्ठरोग सामान्य आहे तेथे निरोगी बालकांमध्ये जन्मानंतर लगेचच एक डोस देण्याची शिफारस केली जाते. क्षयरोग सामान्य नसलेल्या भागांमध्ये केवळ जास्त धोका असलेल्या मुलांनाच विशेषत: लसीकरण केले जाते.
तर क्षयरोगाचा संशय असलेल्या प्रकरणांमध्ये वैयक्तिकरित्या तपासणी आणि उपचार केले जातात. ज्या प्रौढांना क्षयरोग नाही आणि पूर्वी लसीकरण केले गेलेले नाही. पण, वारंवार त्यांना लक्षणे आढळून आले आहे. त्यांनादेखील लसीकरण केले जाऊ शकते.
काही देशांमध्ये बीसीजीचे लसीकरण नियमितपणे केले जाते, तेथे करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर घटल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या उलट अमेरिका, इटली या देशांनी लसीकरण सोडून दिले आहे. त्या देशांमध्ये करोनाचा संसर्ग अधिक असल्याचे निरीक्षण अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या बायोमेडिकल सायन्सेस विभागाने नोंदविले. या संदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआऱ) हा निष्कर्ष लक्षात घेऊन संशोधन करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या