Sunday, May 5, 2024
Homeनाशिकसंचारबंदी कायद्याची वाटेना भिती, हजारोंवर गुन्हे दाखल, दंड, शिक्षेची शक्यता

संचारबंदी कायद्याची वाटेना भिती, हजारोंवर गुन्हे दाखल, दंड, शिक्षेची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी

संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी साडेपाच हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. मास्कचा वापर न केल्या प्रकरणी दररोज किमान दीड हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या संचाबंदीच्या अदखलपात्र गुन्ह्याची तीव्रता नागरिकांना अद्याप जानवत नसल्याने या कारवाईकडे नागरीक दुर्लक्ष करत आहेत. परंतु अगामी काळात त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनचा तिसर्‍या टप्प्यातून आपण जात आहोत. मात्र, करोनाचा प्रसार या टप्प्यातही काबुत आलेला नाही. जिल्ह्यातील मालेगावसह नाशिक शहर, मुंबई, पुणे, यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमध्ये या टप्प्यात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसली. या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने ३ मे नंतरही लॉकडाऊन सुरू ठेवण्यात आला आहे. करोनाचा प्रसार गर्दीद्वारे होतो आहे. हा प्रसार रोखण्यसाठी लॉकडानमध्ये काटेकोरपणे संचारबंदीचे पालन व्हावे यासाठी या काळात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

यासाठी कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियम लागू झाल्यापासून आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणार्‍या साडे पाच हजार व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मास्कचा वापर शहरात अनिवार्य करण्यात आल्यापासून साडेबाराशे जणांविरोधात कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परंतु काही दिवसांपुर्वी शासनानेच मद्य विक्री तसेच इतर व्यावसाय तसेच उद्योगांना शिथिलता दिल्याने सर्व शहरातील व्यवहार पुर्वपदावर आले आहेत. यामुळे नागरीकांना या कारवाईचा धाकच राहिला नसून कायद्याचा वापर करण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसून, गर्दी आवरताना आजही प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.

याचे गांभिर्य नागरीकांनी घेतलेच नव्हते परंतु हा जामीनपात्र गुन्हा असून, मोठ्या संख्येने पोलिस कारवाईचे आकडे समोर येत आहे. या गुन्ह्यांचे खटले काही महिन्यांनी न्यायालयासमोर येतील. या कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. दुसर्‍या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारवास किंवा एक हजार रूपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. भविष्यातील या कार्यवाहीचा आज समाजावर फारसा फरक पडताना दिसत नाही, मात्र हे खटले न्यायालयासमोर आल्यानंतर नागरीकांचे चांगलेच गोंधळ उडणार असल्याचे वास्तव आहे.

काय आहे कलम १८८
१८९७ साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार या काळात काही नियम लागू होतात. तसेच शासनाने निर्देशीत केलेले सरकारी अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेश देऊ शकतात वा काढतात. या आदेशांची पायमल्ली करणार्‍या व्यक्तींवर कलम १८८ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. विशेष म्हणजे कायदा मोडणार्‍या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित वा वित्तहानी झालीच पाहिजे असेही नाही. नियम मोडला की तो व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरतो. या कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. दुसर्‍या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारवास किंवा एक हजार रूपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या