Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात करोनाचे आतापर्यंत 156 बळी

पुण्यात करोनाचे आतापर्यंत 156 बळी

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे आणि पुणे जिल्ह्यात सातत्यानं बाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. पुण्यात बुधवारी दुपारपर्यंत 2737 बाधित रुग्ण आणि 156 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर जिल्ह्यात दुपारपर्यंत 3 हजार 169 बाधित रुग्ण आणि 168 जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुण्यात 1209 रुग्ण डिस्चार्ज झालेत तर जिल्ह्यात आतापर्यंत 1358 रुग्ण डिस्चार्ज झालेत. पुण्यात आतापर्यंत 10 तारखेला सर्वाधिक तब्बल 194 रुग्ण डिस्चार्ज झालेत. तर जिल्ह्यात दहा तारखेला आतापर्यंत सर्वाधिक 202 रुग्ण डिस्चार्ज झालेत. गेल्या 12 दिवसांपासून सातत्यानं 50 पेक्षा जास्त रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहे.

पुण्यात सध्या 1372 रुग्ण क्टिव आहेत. म्हणजेच डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचं प्रमाण हे डमिट रुग्णांपेक्षा केवळ 163 अंकांनी कमी आहे. तर जिल्ह्यात 1608 ऍक्टिव्ह रुग्ण असून 1358 डिस्चार्ज झालेत. म्हणजेच क्टिव रुग्णांचे प्रमाण हे डिस्चार्ज रुग्णांपेक्षा केवळ अडीचशेनं जास्त आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवीन नियमावलीनुसार रुग्णांना दहा दिवसात डिस्चार्ज केलं जातंय. त्यामुळे दहा तारखेपासून डिस्चार्ज होणार्‍या रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या