Friday, May 3, 2024
Homeनाशिकमालेगावात सात, दिंडोरीत तीन तर सिन्नरमध्ये आढळला एक रुग्ण; जिल्ह्यातील रुग्णसंख्या पोहोचली...

मालेगावात सात, दिंडोरीत तीन तर सिन्नरमध्ये आढळला एक रुग्ण; जिल्ह्यातील रुग्णसंख्या पोहोचली ७७० वर

नाशिक | प्रतिनिधी 

आज नाशिक जिल्ह्यात सकाळी पुन्हा ११ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहे. यामध्ये सात रुग्ण मालेगाव येथील, तिघे दिंडोरीतील तर एक रुग्ण सिन्नरमधील आढळून आला आहे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधितांची संख्या ७७७ झाली आहे. एकट्या मालेगाव शहरात दुपारी १२ वाजेपर्यंत ६०९  वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. तर नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. करोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावातील परिस्थिती दिवसेंदिवस गँभीर होऊ लागली  आहे.  आज मालेगाव शहरातील समतानगर, एकतानगर, हिम्मतनगर, सावता नगर यासह मालेगाव शहरतील इतर भागातील काही रुग्ण मिळून एकूण ७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

मालेगाव शहर वगळता नाशिक शहरातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी आणि इंदोरे याठिकाणच्या तीन रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. तर सिन्नर तालुक्यातील पांढूंर्ली येथेही आज सकाळी एक रुग्ण अबाधित आढळून आला आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्यमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

एकुण रुग्ण – ७७०
नाशिक – ४२
मालेगाव – ६०९ 
ग्रामिण – ९८
मृत्यु – ३३
करोना मुक्त – ४५९

- Advertisment -

ताज्या बातम्या