Friday, May 3, 2024
Homeनाशिकदेशदूत इम्पॅक्ट : प्रशासन खडबडून जागे; टेस्टिंग लॅबला किट उपलब्ध करुन देण्याचे...

देशदूत इम्पॅक्ट : प्रशासन खडबडून जागे; टेस्टिंग लॅबला किट उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मविप्रच्या करोना टेस्टिंग लॅबला स्वॅब तपासणीसाठी आवश्यक कीट व इतर साहित्य उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र तरीदेखील जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाकडून किट पुरवले जात नसल्याचे पोलखोल करणारे वृत्त दै. देशदूतने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लॅबला आवश्यक ते साहित्य जिल्हा रुग्णालयाने उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

लॅबला आवश्यकतेनूसार किटचा पुरवठा व्हावा आणि लॅब पूर्ण क्षमतेने कार्यन्वित रहावी यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी वैद्यकिय अधिकारी डाॅ. लोहाडे यांची पूर्णवेळ नियुक्ति केली आहे. लॅबच्या कामात सूसुत्रता ठेवण्याचि जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. धुळे व पुणे येथील लॅब शासकिय असून तेथून स्वॅब नमुने तपासणी करुन घेण्यास हरकत नाही.

हेही वाचा : आरोग्यमंत्र्यांचे  आश्वासन हवेत;  टेस्टिंग लॅबला मिळेना किट; धुळे व पुण्याला स्वॅब पाठविण्याचे गौडबंगाल काय?

लॅब चालवणे ही पूर्णपणे तांत्रिक बाब असून तेथे कोणती सामग्री लागते याबद्दल तंत्रज्ञांनी आपसात समन्वय ठेवून त्याची जिल्हा रुग्णालयाकडे मागणी नोंदवावी. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेणे व त्याचा पुरवठा लॅब ला करणे अभिप्रेत आहे.

यापुढे या कारवाईमध्ये अधिक सुसूत्रता रहावी याकरता एक वैद्यकीय अधिकारी डॉ लाहाडे यांची पूर्णवेळ नियुक्ती या कामासाठी करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. एकंदरीतच राज्यातील सर्वच लॅब चा अनुभव पाहता प्रत्येक जिल्ह्याला दोन-तीन तरी लॅब स्वतःच्या हाताशी ठेवणे श्रेयस्कर आहे व त्याचप्रमाणे बहुतांश जिल्हे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या