Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेश१४ दिवसांत १० लाख स्थलांतरित मजूर स्वगृही

१४ दिवसांत १० लाख स्थलांतरित मजूर स्वगृही

नवी दिल्ली – देशात करोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक स्थलांतरित मजूर विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अशा मजुरांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन ची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून दिलेल्या  माहितीनुसार १ मे पासून तब्बल १० लाख स्थलांतरित मजुरांना ८०० रेल्वेंद्वारे त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.

आतापर्यंत त्यांना गावी जाण्यास परवानगी नव्हती, मात्र लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात या स्थलांतरित मजुरांना गावी जाण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज हजारो स्थलांतरित मजूर मिळेल त्या वाहनाने अथवा पायपीट करत आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रवास करत आहेत.तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी संपण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. मात्र देशासह राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची  शक्यता आहे. अशावेळी या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न अधिकच बिकट होऊ शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या