Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात करोनाने आतापर्यंत 185 मृत्यू; 133 गंभीर

पुण्यात करोनाने आतापर्यंत 185 मृत्यू; 133 गंभीर

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) –  पुणे जिल्हयात शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 3 हजार 490 बाधीत रुग्ण असून करोना बाधित 1 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 603 आहे. करोना बाधित एकूण 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 133 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

- Advertisement -

दरम्यान, पुणे विभागातील 1 हजार 886 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 20 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 1 हजार 924 आहेत. विभागात करोना बाधीत एकुण 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 145 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 490 बाधीत रुग्ण असून करोना बाधित 1 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 1 हजार 603 आहे. करोना बाधित एकूण 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 133 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्हयातील 125 करोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 88 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 336 करोना बाधीत रुग्ण असून 110 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 205 आहे. करोना बाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 43 करोना बाधीत रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 13 आहे. करोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 26 करोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 15 आहे. करोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या