Monday, May 6, 2024
Homeनाशिकआपका यह नेक काम हमेशा याद रहेंगा; गोरगरीब मुस्लिम कुटुंबियांनी केली कृतज्ञता...

आपका यह नेक काम हमेशा याद रहेंगा; गोरगरीब मुस्लिम कुटुंबियांनी केली कृतज्ञता व्यक्त

मालेगाव | प्रतिनिधी

आपका यह नेक काम हमेशा याद रहेगा, उपरवाले की सदा रहेमत आपपर रहे, अशा शब्दात गोरगरीब मुस्लिम बांधवांतर्फे कृतज्ञता व्यक्त करत पोलीस यंत्रणेच्या कार्याला येथे सलाम केला गेला. ग्रामीण पोलीस दलातर्फे रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब मुस्लीम कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

तब्बल एक हजार कुटुंबियांना या मदतीचा लाभ दिला. आर्थिक विवंचनेत उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविताना त्रस्त झालेले हे कुटुंबीय मिळालेल्या जीवनावश्यक वस्तू मुळे अक्षरशः भारावले गेले होते. या मदतीचे वाटप करणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ आरती सिंह अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांचे आपका ये नेक काम हमेशा याद रहेगा, आपको दुवा मे याद रखेंगे अशा शब्दातआभार मानून कृतज्ञता व्यक्त करत होते.

करोना पादुर्भावच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन व संचारबंदी सुरू आहे. यामुळे सर्व कामकाज बंद असल्याचा सर्वाधिक फटका गोरगरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना बसत आहे. या कुटुंबाची आर्थिक ओढाताणमुळे दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर आलेल्या रमजान ईद सण साजरा कसा करायचा? असा प्रश्न या गोरगरीब कुटुंबियांस समोर उभा होता सदरची परिस्थिती लक्षात घेत ग्रामीण पोलीस दलातर्फे हे 1000 कुटुंबियांना किराणा साहित्याचे वाटप विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ आरती सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रत्येक पाकिटात पाच किलो तांदूळ, एक किलो साखर, एक किलो-एक किलो रवा ,एक किलो तूर डाळ, अर्धा किलो खजूर,  अर्धा किलो मिरची पावडर, अर्धा किलो हळद पावडर, चहा पावडर, अंघोळीचे चार साबन अशा वस्तूंचे वाटप यावेळी केले गेले.

लॉकडाऊन व संचारबंदी काळात ग्रामीण पोलीस दलातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गोरगरीब कुटुंबियांना सातत्याने करण्यात येऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्‍यक वस्तूंची अडचण गरीब मुस्लिम कुटुंबीयांना भेडसावू नये या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ आरती सिंह यांनी दिली. कार्यक्रमास अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे उपाधिक्षक मंगेश चव्हाण रत्नाकर नवले यांच्यासह विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या