Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिन्नर : भरधाव ट्रकची चेकपोस्टला धडक; कर्तव्यावरील शिक्षक गंभीर जखमी

सिन्नर : भरधाव ट्रकची चेकपोस्टला धडक; कर्तव्यावरील शिक्षक गंभीर जखमी

सिन्नर | प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील जिल्हा नाकाबंदी कर्तव्यावर असलेले शिक्षक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. चेकपोस्टवर त्यांची ड्युटी असतानाचा   महामार्गावरून भरधाव आलले ट्रक थेट नाकाबंदीनजीक असलेल्या तंबूत शिरला. या घटनेत वावी (ता. सिन्नर) येथील शिक्षक सुनील बबनराव डुकरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. सीमाभागात ग्रामीण पोलिसांनी चेकपोस्ट उभारल्या असून याठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. अपुऱ्या पोलिसांच्या मनुष्यबळामुळे काही शिक्षकांना याठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे.

यानुसार सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील सुनील डुकरे हे याठिकाणी कर्तव्य बजावत होते. याच वेळी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोपरगावकडून येणारा गॅस सिलेंडरचा ट्रक त्यांच्या तंबूत शिरला.   याच वेळी डुकरे याठिकाणी उभे होते तर इतर कर्मचारी त्यांच्यापासून काही अंतरावर असल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघातात जखमी डुकरे यांना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळाली आहे.

दरम्यान, ट्रकचालक मद्यपान केलेला होता त्यामुळे ट्रकवरील त्याचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती वावीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी देशदूतशी बोलताना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या