Monday, May 6, 2024
Homeनगरकरोनाबाधीत महिलेच्या जावई व नातवाचे रुग्णालयातून पलायन

करोनाबाधीत महिलेच्या जावई व नातवाचे रुग्णालयातून पलायन

नेवाशाला परतलेल्या जावयाला प्रशासनाने पुन्हा नेले रुग्णालयात

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथे क्वारंटाईन असलेल्या 60 वर्षीय महिलेचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कातील तिचा जावई आणि नातू यांना काल सोमवारी अहमदनगर येथे स्वॅप घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सकाळी या पिता-पुत्राने जिल्हा रुग्णालयातून धूम ठोकली की तेथून नजरचुकीने काढून देण्यात आले याबद्दल गावात तर्क-वितर्क लावण्यात येत आहे.

- Advertisement -

आपल्या राहत्या घरी नेवासा बुद्रुक येथे येत असल्याची माहिती गावातील पोलीस पाटील व नागरिकांना कळताच पुन्हा एकदा पोलीस, गावकरी, पोलीस पाटील, व ग्रामस्तरीय दक्षता समितीने या दोघांपैकी पित्याला गावातील स्मशानभूमीजवळ पकडले. मुलाबद्दल विचारपूस केली असता मनोरुग्ण मुलगा नगर येथील बसस्थानक येथूनच बेपत्ता झाला असल्याचे त्यांच्या वडिलांनी यावेळी सांगितले. सदरील व्यक्ती गावात परत आल्याने येथे मोठी खळबळ उडाली.

प्रशासन, ग्रामस्थ व दक्षता समितीच्या सतर्कतेने पित्याला गावातील स्मशानभूमी जवळ पकडण्यात यश आले. यानंतर सदरील व्यक्तीला 108 रुग्णवाहिकेतून विलगिकरण कक्ष येथे पाठवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वॅप घेण्याअगोदरच या पिता-पुत्राने रुग्णालयातून पळ काढला असल्याची मोठी चर्चा तालुक्यात सध्या रंगली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या