Monday, May 6, 2024
Homeजळगावचाळीसगाव : डोण येथील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

चाळीसगाव : डोण येथील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

चाळीसगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील डोण येथे पुन्हा एक ४० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. कोरोना सदृश्य लक्षण जाणवत असल्याने, या रुग्णाला चाळीसगाव येथून जळगाव येथे उपाचारासाठी हलविण्यात आले होते. त्याचा स्वॅबचा तपासणीचा अहवाल आज आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ.डी.के.लांडे यांनी दिली. या आगोदार डोण येथे मयत वृध्दाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा डोण येथे नव्याने कोरोनाचा रुग्ण आढळुन आल्याने ग्रामीण भागात भितीचे वातावरण परसले आहे. डोण येथे रुग्ण वास्तव्यास असलेल्या परिसर सील करण्याचे प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम देखील वैद्यकिय पथकाने चालू केले आहे.

- Advertisement -

आता तालुक्यात कोरोना बाधित एकूण १० रुग्ण संख्या झाली असून शहरातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांचा अहवाल आज येण्याची शक्यता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या