Monday, May 6, 2024
Homeजळगावचाळीसगाव : नर्स आणि कंपाऊडरचा करोना अहवाल पॉझिटीव्ह ; शहरवासियांची चिंता वाढली

चाळीसगाव : नर्स आणि कंपाऊडरचा करोना अहवाल पॉझिटीव्ह ; शहरवासियांची चिंता वाढली

चाळीसगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील डोण येथील दोन महिला कालच करोना पॉझिटिव्ह झाल्याचे उघड झाले होते. आता पुन्हा अवघ्या काही तासात शहरातील कोव्हिड केअर सेन्टरमध्ये काम करणारी एक नर्स व खाजगी रुग्णालयातील कंपाऊडर यांना करोनाची बाधा झाली आहे.

- Advertisement -

त्यांच्या स्वॅबचा तपासणीचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी दिली.

करोनाग्रस्त एक जण शहरातील हनुमानवाडी तर दुसरा करगाव रोड येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. करोना बाधितांच्या घराचा पाहणी तहसीलदार अमोल मोरे, डॉ.डि.के.लाडे यांनी केली असून तो परिसर कन्टेमेंट झोन म्हणून घोषीत केला.

तसेच शहारातील दोघे करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या १२ ते १५ जणांना क्वारंटाईन करण्याची प्रकिया सुरु असून त्यांचे स्वॅब घेवून ते जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

कोव्हिड केअरमधील नर्स कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला करोनाची बांधा झाली, तर डोण येथील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने खाजगी रुग्णालयातील कंपाऊडरला करोनाची बाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान ग्रामीण भागाबरोबरच शहरातही करोना हळूहळू पसरत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या