Wednesday, May 15, 2024
Homeनगरनगर – जिल्ह्यात आणखी ०५ करोना बाधित

नगर – जिल्ह्यात आणखी ०५ करोना बाधित

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – आज जिल्ह्यात आणखी नवीन ०५ रुग्णांची भर पडली आहे तर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. संगमनेर शहरातील दाते मळा येथील ३८ वर्षीय महिला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिलेचाही समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या