Monday, May 6, 2024
Homeभविष्यवेधमनाला आणि आत्म्याला शांती देणारा अनाहत ध्वनी ॐ

मनाला आणि आत्म्याला शांती देणारा अनाहत ध्वनी ॐ

हिंदू धर्मात ओम एक विशिष्ट ध्वनी शब्द आहे. तपस्विनी आणि ध्यान करणार्‍यांनी ध्यानस्थ होऊन ऐकल्यावर त्यांना सतत ऐकू येणारा ध्वनी. शरीराच्या आंतरिक आणि बाह्य सर्वत्र एकच ध्वनी ज्याने मनाला आणि आत्म्याला शांती मिळते, त्या ध्वनीला ओम नाव दिले गेले.

अनहद नाद : या आवाजाला अनाहत देखील म्हणतात. अनाहत म्हणजे कोणत्याही टकरावामुळे उत्पन्न होत नसून स्वयंभू. यालाच नाद म्हटले आहे. ओम एक शाश्वत ध्वनी आहे. यापासूनच संपूर्ण ब्रह्मानंदाची निर्मिती झाली. हा आवाज संपूर्ण कणाकणातून, अंतराळातून, माणसाच्या आतून येतं आहे. सूर्यासह हा ध्वनी जगातील प्रत्येक घराघरातून येतं आहे.

- Advertisement -

विश्वाचा जन्मदाता : शिव पुराणामध्ये असे मानले गेले आहे की नाद आणि बिंदूचे मीलन झाल्याने विश्वाची उत्पत्ती झाली असे. नाद म्हणजे ध्वनी किंवा आवाज आणि बिंदू म्हणजे शुद्ध प्रकाश. हा आवाज आजतायगत सुरूच आहे. ब्रह्म प्रकाश स्वतःच प्रकाशित आहे. भगवंताचा प्रकाश. यालाच शुद्ध प्रकाश असे ही म्हणतात. पूर्ण विश्वात अजून काही नसून फक्त कंपन, ध्वनी आणि प्रकाश एवढेच आहे. जिथे जास्त ऊर्जा असेल तिथे तेवढे जास्त जीवन असणार. हा जो सूर्य आपण बघत आहोत, त्या सूर्याची ऊर्जा देखील एके दिवशी नाहीशी होणार. हळूहळू सर्वकाही विलीन होणार आणि उरणार फक्त आवाज आणि बिंदू.

ॐ शब्दाचा अर्थ : ॐ शब्द तीन आवाजांनी निर्मित झाला आहे. अ, उ, म…

या तीन आवाजांचा अर्थ उपनिषदामध्ये देखील आढळतो. अ म्हणजे अकार, उ म्हणजे उंंकार आणि म म्हणजे मकार. ‘अ’ ब्रह्मा वाचक असून याचे उच्चारण हृदयातून होतं. ‘उ’ विष्णू वाचक असून कंठातून उच्चारतात आणि ‘म’ हे रुद्र वाचक असून टाळूमधून उच्चारतात.

ओम चे आध्यात्मिक अर्थ : ओ, उ आणि म या तीन अक्षरी शब्दांचा मानच वेगळा आहे. हे नाभी, हृदय आणि आज्ञा चक्राला जागृत करतं. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे प्रतीक आहे. हे भू लोक (पृथ्वी), भूव:लोक (अंतराळ) आणि स्वर्गलोकाचे प्रतीक आहे. ओंकार या आवाजाचे 100 पेक्षा जास्त अर्थ दिले आहेत.

मोक्षाचे साधन : ओम हा एकमेव असा प्रणव मंत्र आहे जो आपल्याला मोक्षाकडे नेतो. धर्मशास्त्रानुसार मूळमंत्र किंवा जप तर ओमच आहे. या ओमच्या मागील किंवा पुढील लिहिलेले शब्द गौण असतात. ॐ शब्दच महामंत्र आणि जपण्यासाठी योग्य आहे. याला प्रणव साधना देखील म्हटले जाते. हे शाश्वत आणि असीम आणि निर्वाण कैवल्य ज्ञान किंवा मोक्षाची स्थिती दर्शवते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या विचारांमध्ये गुंग होऊन सर्व भान हरपते तेव्हा त्याला फक्त हाच आवाज सतत येतं असतो.

प्रणवचे महत्त्व : शिव पुराणामध्ये प्रणवचे वेगवेगळे शाब्दिक अर्थ सांगितले आहेत. ‘प्र’ म्हणजे प्रपंच, ‘ण’ म्हणजे नाही आणि ‘व’ म्हणजे आपल्यासाठी. सारांश असे आहे की हे प्रणव मंत्र सांसारिक जीवनातील मतभेद आणि दुःख दूर करून जीवनाच्या महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचवितो. याच कारणामुळे ॐ ला प्रणवच्या नावाने ओळखतात. दुसर्‍या अर्थात प्रणवला प्र म्हणजे निसर्गापासून बनलेल्या या जगारूपी सागराला ओलांडणारी, ण म्हणजे होडी सांगितले आहे. याच प्रकारे ऋषिमुनींच्या दृष्टिकोनातून प्र म्हणजे प्रकर्षेण, ‘ण’ म्हणजे नयेत् आणि ‘व:’ म्हणजे युष्मान् मोक्षम् इति वा प्रणव: सांगितले आहेत. ज्याचा सोप्या शब्दांमध्ये अर्थ आहे की प्रत्येक भक्ताला शक्ती देऊन जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करण्यावाचून होणारा हा प्रणव आहे.

आपोआप स्वतःच उत्पन्न होणारा जप : ॐ च्या उच्चारणाचा सराव करता करता अशी वेळ येते की उच्चारण करण्याची गरजच नसते. आपण आपले डोळे आणि कान बंद करून आत ऐकल्यावर आपणास तो आवाज ऐकू येतो. आधी तो आवाज सूक्ष्म आणि नंतर त्याची तीव्रता वाढू लागते. साधुसंत म्हणतात की हा आवाज सुरुवातीस एका कोळंबीच्या आवाजासारखा येतो. नंतर बीन वाजल्यासारखे वाटते, नंतर ढोलाची थाप ऐकू येते. त्यानंतर शंखासारखा आवाज येतो. शेवटी हे शुद्ध वैश्विक आवाज ऐकू येतो.

शारीरिक व्याधी आणि मानसिक शांतीसाठी : या मंत्राचा सतत जप केल्याने शरीर आणि मनाला एकाग्र करण्यास मदत मिळते. हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण सुरळीत होतो. यामुळे शारीरिक व्याधींसह मानसिक आजार देखील दूर होतात. कार्यक्षमता वाढते. याचे उच्चारण करणारे तसेच ऐकणारे दोघेही फायद्यात असतात.

सृष्टीचा नाश करण्याची क्षमता : ओमच्या आवाजात संपूर्ण विश्वाच्या कोणत्याही घराला नष्ट करण्याची किंवा पूर्ण जगाचा नाश करण्याची क्षमता आहे. हा आवाज लहानाहून लहान किंवा मोठ्याहून मोठा होण्याचे सामर्थ्य ठेवतं.

शिवाच्या ठिकाणी ओमचा उच्चारण केला जातो : सर्व ज्योतिर्लिंगाजवळ आपोआप ओम चे उच्चारण होत राहतात. जर का आपण कधी तरी कैलास पर्वत किंवा मानस सरोवराच्या क्षेत्रात गेला तर आपणास सतत एक आवाज ऐकू येईल, जसे की जवळपास विमान उड्डाण करीत आहे. पण लक्ष देऊन ऐकल्यावर हा आवाज डमरू किंवा ॐ चा ऐकू येतो. शास्त्रज्ञ म्हणतात की कदाचित हा आवाज बर्फ वितळण्याचा असू शकतो. किंवा हे देखील संभव आहे की प्रकाश आणि आवाजामध्ये समागम झाल्यामुळे इथून ‘ॐ’ चा आवाज ऐकू येतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या