Friday, May 3, 2024
Homeराजकीयनाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्रावर खापर फोडण्याचा प्रयत्न- महाजन

नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्रावर खापर फोडण्याचा प्रयत्न- महाजन

कोपरगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे त्यांचेवरील जनतेचा असलेला विश्वास आणखी वाढला असून देशात आलेल्या करोना महामारीच्या संकटाला केंद्र सरकार धैर्याने तोंड देत आहे.

नागरीकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घरात तर भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सर्वस्तरावर मदत करीत आहे. राज्यसरकार आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

- Advertisement -

मोदी सरकारने दुसर्‍या टर्ममधील पहिले वर्षं यशस्वीरीत्या पुर्ण केल्याबददल देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने व्हर्चुअल सभेचे आयोजन केले जात आहे. माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आ. महाजन यांच्यांशी संवाद साधला.

आ. महाजन म्हणाले, केंद्र सरकारच्या कलम 370, राममंदिर, तिहेरी तलाक, पंतप्रधान किसान सन्मान योजना, जनधन योजना, सर्जिकल स्ट्राईक, मोफत उज्वला गॅस योजना,आरोग्य सेतु, नागरीकत्व कायदा, वयाच्या साठीनंतर पेन्शन योजना, बचतगटाशी जोडलेल्या भगिनींना आणखी आर्थीक सहाय्य, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरजूंना मोफत अन्नधान्य या मोदी सरकारच्या काळातील लोकप्रिय योजनांची माहिती दिली.

सौ कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, युवकांना सशक्त करण्यार्‍या गोष्टींना प्राधान्य दिले. लोकाभिमुख योजनाची निर्मिती जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान मोदी तळागाळातील सर्व घटकांचा विचार करून देशाला खर्‍या अर्थाने विकासाकडे नेण्याचे काम करत असल्याचे सौ. कोल्हे म्हणाले.

यावेळी उपस्थित कार्यकर्ते यांनी आमदार महाजन यांचेशी संवाद साधला. यावेळी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, जिल्हा संयोजक शरद थोरात, केशवराव भवर, दिलीपराव दारूणकर, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, माजी सभापती सुनिल देवकर, दत्ता काले, हरिभाउ गिरमे, महावीर दगडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष योगिता होन, शहराध्यक्षा शिल्पा रोहमारे, भाजपा सोशल मिडीया सेलचे जिल्हा संयोजक भाउसाहेब वाकचैरे, व्हर्चुअल सभेचे जिल्हा संयोजक योगराजसिंग परदेशी उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप दारूणकर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या