Friday, May 3, 2024
Homeराजकीयशेतकर्‍यांचा कांदा थेट राज्य शासनाने खरेदी करावा - स्नेहलता कोल्हे

शेतकर्‍यांचा कांदा थेट राज्य शासनाने खरेदी करावा – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात थैमान घालणार्‍या करोनाच्या आजारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकटाला सामोरे जावे लागत आहे. कांद्याचे बाजारभाव कोसळून मातीमोल झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी भयानक आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना आधार देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रनतील कांदा उत्पादकांचा कांदा थेट राज्य शासनाने खरेदी करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

- Advertisement -

मागील वर्षी अवकाळी पावसाने दोनतीन वेळा टाकलेली कांदा रोपे नष्ट झाली होती. वेळप्रसंगी अत्यंत महागाचे कांदा बी व कांदा रोपे विकत घेऊन लागवड केली; परंतु अत्यंत प्रतिकूल हवामान वातावरणामुळे खते व औषधांवर खूपच मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. कांदा काढणी चालू असताना नेमकी करोनाचा प्रादुर्भाव झाला होता. वेळोवेळी लॉकडाऊन केल्यामुळे मजूर मिळणे अवघड झाल्यामुळे शेतकर्‍यांनी अनेक अडचणी सहन केल्या.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व मानसिक, आर्थिक नुकसान सहन करून कांद्याचे उत्पादन घेतले. सर्व साधारणपणे जून महिन्यात कांद्याचे बाजारभाव वाढतात; परंतु जुलै महिन्याची सुरुवात झाली तरी बाजारभाव वाढण्याचे कुठलेही चिन्ह दिसत नसल्यामुळे शेतकर्‍यांपुढे संकटाचे चिन्ह नक्कीच दिसायला लागले आहे. मोठ्या कष्टाने, आर्थिक झळ सोसून उत्पादित केलेल्या कांद्याला मात्र बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सध्या मिळत असलेला बाजारभाव पाहता कांदा उत्पादकाला तोटा सहन करावा लागत आहे.

शेतकर्‍यांचा आर्थिक कणाच मोडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना शाश्वत हमीभाव देऊन कांदा खरेदी करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या