Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यातील भाजप आमदार करोना पाॅझिटिव्ह

नाशिक जिल्ह्यातील भाजप आमदार करोना पाॅझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ राहुल आहेर यांची करोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. आमदार डॉ आहेर यांना करोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांनी टेस्ट करून घेतली, काल या टेस्टचे अहवाल प्राप्त झाले असून ते बाधित आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान,डॉ आहेर यांच्या संपर्कात गेल्या 7-8 दिवसात आली असतील टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

डॉ. आहेर हे करोनाचा संसर्ग झालेले तिसरे आमदार आहेत. यापुर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर हे देखील कोरोनाचा संशय आल्याने स्वत:हून घरीच क्वारटाईन झाले होते.

डॉ आहेर मतदारसंघातील विविध उपक्रमांत व्यस्त होते. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील दौरे सुरु केले होते.

या कालावधीत त्यांनी विविध बैठकाही घेतल्या. दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत वाटत असल्याने त्यांनी स्वतच आपल्या स्वॅबची चाचणी करुन घेतली.

त्यात काल त्याचा अहवाल काल पाॅझिटिव्ह आला. दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्या नागरिक, कार्यकर्ते व हितचितकानी दक्षता घ्यावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. क्वारटाईन कालावधी संपुष्टातच येताच आपण पुन्हा पुर्ववत कामकाजाला मतदारसंघात परत येऊ असेही त्यांनी सांगितले आहे.

नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला होता. आमदार अहिरे याना डिस्चार्ज घेतला आहे. आमदार दराडे सध्या क्वारंटाईन आहेत. त्यांच्या पाठोपाठ आमदार आहरे हे तिसरे आमदार ठरले आहेत.

थोडी शंका आली होती म्हणून…काल कोरोना तपासणी केली, दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटिव्ह आला आहे. आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होईल आणि आपल्या सेवेत तत्पर होईल. तरी गेल्या 7-8 दिवसात माझ्यावर प्रेम करणारी जी लोक माझ्या संपर्कात आली त्यानां माझी विनंती आहे की, आपण सर्वानी काळजी घ्यावी तसेच आपणास काही त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटून तपासणी करुन घ्यावी ही विनंती.

आ. डॉ. राहुल दौलतराव आहेर

- Advertisment -

ताज्या बातम्या