Friday, May 3, 2024
Homeनगरमुळातील पाणीसाठा 10000 दलघफूवर

मुळातील पाणीसाठा 10000 दलघफूवर

कोतूळ, भंडारदरा|वार्ताहर|Kotul

मुळा धरण पाणलोटातील हरिश्चंद्र गड, अंबित व अन्य परिसरात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाल्याने मुळा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. गत 25 तासांत तब्बल 471 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणातील काल सायंकाळी 7 वाजता पाणीसाठा 10110 दलघफू झाला होता.

- Advertisement -

गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे आज शनिवारी या धरणातील पाणीसाठा 40 टक्क्याच्या पुढे सरकणार आहे.

मुळा पाणलोटात पाऊस गायब झाल्याने नदीतील पाणी कमी झाले होते. या नदीतील प्रवाह 404 क्युसेकवर आला होता. पण गुरूवारी दुपारपासून पावसाचे प्रमाण वाढले आणि डोंगर-दर्‍यांमधील ओढे-नाले सक्रिय झाल्याने नदीतील पाणी विसर्ग काल 1873 क्युसेक झाला होता. अजूनही अधून मधून पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू झाल्याने धरणात मंदावलेली पाण्याची आवक आता पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

भंडारदरा पाणलोटातही गुरूवारी जोरदार पाऊस झाल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक दोन दिवसांच्या तुलनेत वाढली आहे. गत 24 तासांत 42 दलघफू पाण्याची आवक झाली. 11039 क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 5038 दलघफू झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या