Monday, May 6, 2024
Homeभविष्यवेधविद्यार्थ्यांच्या हातांवरील रेषा त्यांच्या विविध क्षेत्रांतील यशस्वितेच्या असतात मार्गदर्शक !

विद्यार्थ्यांच्या हातांवरील रेषा त्यांच्या विविध क्षेत्रांतील यशस्वितेच्या असतात मार्गदर्शक !

प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

- Advertisement -

मागच्या लेखात आपण पाहिले की बोटांवरील छाप विद्यार्थ्यांच्या उपजत कला व गुण दाखवितात, त्या प्रमाणेच प्रत्येकाच्या हातावरील भाग्यरेषा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील विविध क्षेत्रांतील आर्थिक संधीचे मार्गदर्शक असतात. आज आपण हातावरील भाग्यरेषा व भाग्यरेषांचे हातावरील विविध प्रकार त्या त्या विद्यार्थ्याला आर्थिक सुबत्ता देण्याच्या हेतूने पूरक असतात. भाग्यरेषा त्या व्यक्तीचे त्या त्या क्षेत्रातील उपजत गुण व कलाकौशल्य जे स्वयं ब्रह्माने दिले आहेत, त्यांचे स्वतंत्रपणे कारकत्व आपण आज पाहणार आहोत.

आयुष्यरेषेतून भाग्यरेषा बाणाने दाखविल्याप्रमाणे उगम पावून शनी ग्रहावर जात असेल तर, असे विद्यार्थी भाग्यवान असतात. दोन्ही हातांवर अशी स्थिती असेल तर अतिभाग्यवान असतात; परंतु फक्त उजव्या हातावर भाग्यरेषा आयुष्यरेषेतून उगम पावून शनी ग्रहावर जात असेल तरीही अशा विद्यार्थ्यांना सहज नोकरी लागते. वाडवडिलांचा व्यवसाय असेल तर तोही ते उत्तमरीत्या सांभाळतात. अशी भाग्यरेषेची हातावर स्थिती असता, राजकारण व सामाजिक कामात सुद्धा मानसन्मान मिळतो.

चंद्र ग्रहावरून भाग्यरेषेचा उगम होत असेल तर अशा विद्यर्थ्यांना, कोणाच्या तरी मदतीचा हात लागतो, मदतीने हे यशस्वी होतात. यांनी शक्यतो नोकरी करावी, बाणाने चित्रात दाखविल्याप्रमाणे वयाच्या 23 व्या वर्षी भाग्यरेषा आहे त्या पेक्षा बारीक झाली आहे. त्या वेळेस भाग्योदय होतो व नोकरी लागते. ज्या वय वर्षात भाग्यरेषा आहे त्यापेक्षा जास्त बारीक व चमकदार झाली असेल त्या वय वर्षात आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळायला लागते.

हातावर चित्रात दाखविल्याप्रमाणे मधले बोट म्हणजे शनीच्या ग्रहावर सरळ भाग्यरेषा येत असेल, तसेच तिसर्‍या बोटाखाली सरळरेषा येत असेल (तिला रविरेषा म्हणतात) अशी स्थिती असता हे लोक यूपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत मेरिटमध्ये उत्तीर्ण होण्याचा संभव असल्याने, हातावर अशी रवि व भाग्यरेषांची स्थिती असता यांनी स्पर्धा परीक्षा निश्चित द्याव्यात. हे लोक मोठे उद्योजक होऊ शकतात, कोणत्याही क्षेत्रात यांना यश प्राप्त निश्चित होते.

हातावर आयुष्यरेषेतून करंगळीच्या बोटाखालील बुध ग्रहापर्यन्त एक सलग रेषा जाऊन पोहोचली असेल तर, असे लोक अत्यंत चतुर असतात. व्यापारात हे विद्यार्थी चमक दाखवू शकतात, तसेच नोकरीमध्ये मानाचे व उच्च पद हे त्यांच्या हुशारीवर मिळवू शकतात. कुठल्याही क्षेत्रात हे चमक दाखवू शकतात व यशस्वी होतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या