Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहापालिकेची १४ ऑगस्टला व्हिडीओ कॉन्फरसिंग महासभा

महापालिकेची १४ ऑगस्टला व्हिडीओ कॉन्फरसिंग महासभा

नाशिक । Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेची तिसरी व्हिडीओ कॉन्फरसिंग महासभा येत्या १४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी साडे अकरा वाजता महापौर सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या कार्यालयालगतच्या दालना होणार आहे.

- Advertisement -

मागील महिन्यातील मासिक सर्वसाधारण सभा भुसंपादन विषयावरुन चांगलीच गाजली होती. आता १४ ऑगस्टच्या सभेत नव्याने महापालिकेत दाखल झालेले अतिरीक्त आयुक्त अतिरीक्त अष्टीकर, उपआयुक्त श्रीमती करुणा डहाळे, विजय पगार, मुख्य लेखा परिक्षण अधिकारी एन. डी. महाजन, सहा. आयुक्त मेनकर, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजेे यांना रुजू करुन घेणे,

महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वधर्मीय मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी 4 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देणे, कश्यपी धरणाच्या 36 प्रकल्पग्रस्तांना महापालिका सेवेत हजर करुन घेणे, पाथर्डी फाटा चोैकात मनपाच्या जागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणीस फेरपरवानगी देणे आदीसह विषय महासभेवर ठेवण्यात आले आहे.

मागील महासभेत सदस्यांना ऐकु येत नसल्याने अडचणी निर्माण झाल्यानंतर काही नगरसेवकांनी महापौर बसलेल्या ठिकाणी धाव घेतली होती. यामुळे मोठा वाद होऊन आरोप प्रत्यारोपाच्या फेैरी झडल्या होत्या. आता या महासभेत तांत्रिक दृष्ट्या प्रशासनाला तयारी करावी लागणार असुन पुन्हा वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या