Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेत टिकटॉक, वीचॅटवर बंदी

अमेरिकेत टिकटॉक, वीचॅटवर बंदी

वॉशिंग्टन | Washington –

अमेरिकेने चीनला आणखी एक झटका दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क असलेल्या कंपनीसोबत प्रकारच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. Donald Trump ट्रम्प यांनी इमरजन्सी इकॉनॉमिक पॉवर अ‍ॅक्ट अंतर्गत या आदेशाला मंजुरी दिली. इतकेच नाही तर मॉयक्रोसॉफ्ट अथवा अन्य कोणत्याही अमेरिकी कंपनीला ही अ‍ॅप खरेदी करता येणार नाहीत.

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी अ‍ॅप टिकटॉक आणि वीचॅटला 45 दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. बाईट डान्स या कंपनीकडे टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क आहेत. याआधी अमेरिकन कर्मचार्‍यांनी टिकटॉक न वापरण्याच्या आदेशाला सीनेटने एकमताने परवानगी दिली होती.

ट्रम्प म्हणाले, ही बंदी आवश्यक आहे. कारण अविश्‍वासार्ह अ‍ॅपमधून डेटा एकत्र करणे हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, चिनी कम्युनिस्ट पक्षाला डेटा कलेक्शनमुळे अमेरिकेच्या नागरिकांची खासगी आणि मालकी हक्कांसंबंधाची माहिती मिळते. यामुळे चीनला अमेरिकेच्या कर्मचारी आणि ठेकेदारांची ठिकाणे ट्रॅक करण्याची परवानगी मिळते. एवढेच नाही तर कम्युनिस्ट पार्टी वैयक्तिक माहितीचा वापर ब्लॅकमेलिंग किंवा कॉर्पोरेट हेरगिरीसाठी करु शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या