Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापेठ तालुका करोनामुक्त; शेवखंडीतील सर्व अहवाल निगेटिव्ह

पेठ तालुका करोनामुक्त; शेवखंडीतील सर्व अहवाल निगेटिव्ह

पेठ | प्रतिनिधी Peth

शेवखंडीतील १४ रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने पेठ तालुका पुन्हा एकदा करोनामुक्त झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसह तालुकावासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. Peth taluka corona recover

- Advertisement -

काल (दि १२) पेठ तालुक्यातील शेवखंडी येथील ४७ वर्षीय महिलेस करोनाची लागण होऊन मृत्यु झाल्याने परिसर प्रतिबंधीत करण्यात आला होता. यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वब नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले यामध्ये सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सिमारेषेवर शेवखंडी हे दुर्गम गाव वसले आहे. या अतिदुर्गम भागात करोनाचा शिरकाव झाल्याचे वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली होती. बाधित महिलेच्या नजीकच्या संपर्कातील १४ जोखमीच्या नातेवाईकांचे स्वब घेऊन तपासणी साठी पाठवण्यात आले होते.

आज हे स्वब प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नातेवाईकांना आज पेठच्या केंद्रातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या