Tuesday, May 7, 2024
Homeनगरसाईनगर शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजर 19 बोगीची करणार - शैलेश गुप्ता

साईनगर शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजर 19 बोगीची करणार – शैलेश गुप्ता

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मध्य रेल्वेच्या नविन वेळापत्रकामध्ये साईनगर शिर्डी -दौंड- पुणे- मुंबई जलद पॅसेंजर 19 बोगीची करण्यात येईल, असे आश्वासन सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी दिले.

- Advertisement -

सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक करोनामुळे झूम अ‍ॅपवर 13 ऑगस्टला झाली. यावेळी समितीचे सदस्य प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड व विशाल फोपळे यांनी साईनगर ते मुंबई जलद पॅसेंजर ही गाडी 19 बोगीची स्वतंत्र सुरू करण्याची मागणी बैठकीमध्ये प्रामुख्याने मांडली.

नविन वेळापत्रकामध्ये या स्वतंत्र गाडीचा समावेश करून दौंड बायपास मार्गे पुणेकडे जाणार आहे. या स्वतंत्र गाडीमुळे साईभक्तांची सोय होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे असे श्रीगोड यांनी सांगितले. या निर्णयाचे स्वागत देखील केले.

बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्थानक वरील दुर्लक्षीत मागण्यांसंदर्भात चर्चा होऊन प्लॅटफार्म नं. 1 व 2 वरील मालधक्क्याजवळ जोडणारा ब्रीज व 24 बोगी थांबू शकतील असा मोठा प्लॅटफार्म करण्याचे व त्याचे काम त्वरीत सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.

तसेच प्लॅटफॉर्म नंबर 2 वर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बांधण्याचे व उपहारगृह व फ्रुट स्टॉल करिता मंजुरी घेऊन सुरू करण्याचे आश्वासन दिले. साईनगर इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असे नमूद केले.

वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी स्वागत केले. रेल्वे मंडळसह प्रबंधक व्ही. के. नागर व वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक प्रतिक वंजारे यांनी बैठकीत सहभाग घेतला व माहिती दिली. प्रदीप हिरडे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या