Monday, May 6, 2024
Homeनाशिकसिन्नरला पश्र्चिम विभागात 20 वे मानांकन

सिन्नरला पश्र्चिम विभागात 20 वे मानांकन

सिन्नर | प्रतिनिधी

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानात स्वच्छ सर्वेक्षण 2020 चे नामांकन घोषित केले असून सिन्नर शहराचा देशामध्ये पश्र्चिम विभागात टॉप 20 मध्ये समावेश झाला आहे.

- Advertisement -

सिन्नर शहराला 2019 मध्ये 105 क्रमांकाचे मानांकन मिळाले होते. या वर्षी त्यामध्ये सुधारणा होऊन 20 वेे मानांकन मिळाले. आपले सिन्नर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सिन्नर शहरातील सर्व जनतेचे सहकार्य खूप मोलाचे लाभले असून सिन्नर नगरपरिषदेद्वारे हाती घेतलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांची योग्य साथ मिळत गेली.

त्यामुळे शहराला ही मजल मारता आल्याचे नगराध्यक्ष किरण डगळे व मुख्याधिकारी संजय केदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे. सिन्नरकरांचे असेच सहकार्य राहीले तर प्रथम क्रमांकाकडे नक्कीच वाटचाल करु विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर देशात गावापासून शहरापर्यंत स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सिन्नर शहर हे 2017 ला हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाले. त्यानंतर शहरास 2018 मध्ये ओडीएफ + चे मानांकन प्राप्त झाले. 2019 मध्ये ओडीएफ ++ चे मानांकन प्राप्त झाले. तर यंदा पश्र्चिम विभागात देशात 20 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच महाराष्ट्रात 18 वा क्रमांक तर नाशिक विभागात 17 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासाठी अभिनंदनास पात्र असल्याचे या पत्रात म्हटले आहे. या मानांकनामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली असून यापुढे अधिकाधिक चांगले कार्य करून सिन्नर शहरास स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी प्रयत्न करु असेही या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या