Friday, May 3, 2024
Homeजळगावअमळनेरातही चालणार मोक्का न्यायालय

अमळनेरातही चालणार मोक्का न्यायालय

अमळनेर – Amalner – प्रतिनिधी :

नाशिकमध्ये चालणारे मोक्का न्यायालय आता अमळनेरातही चालणार आहे. यामुळे मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची सुनावणी अमळनेर येथेच होणार असल्याने न्यायालयीन कामाला गती येणार आहे.

- Advertisement -

तसेच या न्यायालयासाठी अँड राजेंद्र चौधरी, अँड.किशोर बागुल व अँड शशिकांत पाटील यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तर जिल्ह्यात केवळ जळगाव, भुसावळ आणि अमळनेर येथेच हे न्यायालये चालणार आहेत. त्यामुळे अमळनेरसाठी ही फार मोठी उपलब्धी मानली जात आहे.

संघटित गुन्हेगारी ही समाजात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करते. याला आळा घालण्यासाठी, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) २४ फेब्रुवारी १९९९ साली लागू करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यात मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची सुनावणी नाशिक येथील मोक्का न्यायालयात होती होती. मागील महिन्यात शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हानिहाय मोक्का न्यायालय सुरु करण्यात आले आहेत.

त्यात जळगावातील न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश, अमळनेर आणि भुसावळ येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे मोक्का न्यायालये चालणार आहेत. या न्यायालयात कामकाजासाठी अमळनेर येथे अँड राजेंद्र चौधरी, अॅड.किशोर बागुल व अॅड. शशिकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयामुळे कामात गती येणार

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत चालणारे न्यायालय आता जळगाव जिल्ह्यात सुरु झाले आहे. पूर्वी नाशिक येथे मोक्का न्यायालय चालत होते.

शासनाच्या आदेशानुसार जिल्हानिहाय मोक्का न्यायालये सुरु करण्यात आले आहेत.त्यात अमळनेर आणि जळगाव शहर तसेच भुसावळ या तीन ठिकाणी न्यायालय चालणार आहेत. या निर्णयामुळे कामात गती येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या