Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकाँग्रेसमध्ये संघर्ष कायम : आता सिब्बल यांचे हे वक्तव्य

काँग्रेसमध्ये संघर्ष कायम : आता सिब्बल यांचे हे वक्तव्य

नवी दिल्ली

काँग्रेसमध्ये संघर्ष अजूनही कायम आहे. सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंंतर वाद संपलेला नाही. या वादानंतर काँग्रेसच्या नाराज नेत्यांची बैठक झाल्याचे वृत्त आहे. सिब्बल यांच्या नवीन टि्वटमुळे काँग्रेसमध्ये अजून वादळ सुरुच असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

सोमवारी काँग्रेस कार्यकारी मंडळाची ( congress working committee ) ची बैठक झाली. त्यात अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची पुन्हा एका वर्षासाठी निवड झाली. या बैठकीत राहुल गांधी यांनी २३ नेत्यांकडून दिलेल्या पत्रासंदर्भात प्रश्न उपस्थित करत कपिल सिब्बल व गुलामनबी आझाद यांना लक्ष्य केले होते. यावेळी सिब्बल यांनी टि्वट करत आपण पक्षासाठी काय केले ते सांगितले होते. त्यानंतर नाराजी दर्शवनारे ते टि्वट मागे घेतले होते. आता मंगळवारी पुन्हा एकदा सिब्बल यांनी ट्विट करत आपल्यासाठी देश सर्वाधिक महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केले आहे. “हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही. हा माझ्या देशाचा प्रश्न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे,” असे सिब्बल म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या