Thursday, May 2, 2024
Homeनगरखराब मका ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न

खराब मका ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

रेशनवर प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ अन्न सुरक्षा कार्डधारकांना देण्यात येत होते. मात्र, येत्या सप्टेंबर महिन्यापासून यात बदल करून

- Advertisement -

प्रति व्यक्ती तीन किलो गहूऐवजी दोन किलो गहू व एक किलो मका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात बराचसा मका खराब असून हा खराब मका ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होणार आहे.

तरी मका देण्याचा हा निर्णय बदलून मकाऐवजी पूर्वीप्रमाणेच प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती देण्यात यावा, अशी मागणी हिंदू एकता पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

2013 सालापासून अन्नसुरक्षा योजना सरकारने सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येतो. करोना महामारीचे गाभीर्य लक्षात घेऊन गोरगरिबांसाठी असलेल्या अन्नसुरक्षा कार्डधारकांना सरकारने प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ एप्रिल महिन्यापासून मोफत दिला.

मात्र यात बदल करून आता येत्या सप्टेंबर महिन्यापासून प्रति व्यक्ती तीन किलो ऐवजी दोन किलो गहू देऊन त्यातल्या एक किलो गव्हाच्या बदल्यात एक किलो मका देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे समजते.

गव्हाच्या पोळ्यांची रोजच्या आहारात अडचण येत नाही, मात्र मका घेऊन त्याच्या भाकरी नेहमी खाणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने मका देऊ नये, त्याऐवजी पूर्वीप्रमाणेच प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ अन्न सुरक्षा कार्डधारकांना देण्यात यावा.

पत्रकावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे, शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, मनोहर बागुल, चिलिया तुवर, प्रसिद्धीप्रमुख अमिरभाई जहागीरदार, वसंत गायकवाड, विजय जगताप, नागनाथ डोंगरे, राजेंद्र जाधव, शिवाजी फोफसे, जयराम क्षीरसागर, बाळासाहेब आगळे, अविनाश कनगरे, भिकन शेख, सोमनाथ जगताप, गुरु भुसाळ, संजय ढगे, वसंतराव धंदक, सुभाष कासलीवाल आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या