Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC च्या परीक्षांबाबत मोठा निर्णय

MPSC च्या परीक्षांबाबत मोठा निर्णय

करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोग्याच्या MPSC परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली. त्यासंदर्भात टि्वट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे टि्वटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यातच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जेईई आणि नीटच्या मुद्दयावरुन काँग्रेसने वर्च्युअल बैठकीचे आयोजन केले होते. त्यात ठाकरे यांनी जेईई आणि नीटची परीक्षा घेण्यास विरोध केला होता. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत MPSC परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या