Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : मॉलच्या धर्तीवर 'नाशिक फार्मर्स मार्केट'

Video : मॉलच्या धर्तीवर ‘नाशिक फार्मर्स मार्केट’

नाशिक । प्रतिनिधी

परदेशातील अत्याधुनिक शहरांतील शेतीमाल मॉलच्या धर्तीवर नाशिक शहरात नाशिक फार्मर्स मार्केट या शेतीमालासह विविध वस्तुच्या अत्याधुनिक मॉलचा शुभारंभ आज झाला. ताजा, उत्तम गुणवत्तेचा शेतीमाल एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा पहिला प्रयोग नाशिक शहरात सुरू…

- Advertisement -

झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी नाशिककरांकडुन यास मोठा प्रतिसाद मिळाला. इंग्लड शहरातील कृषीमाल विक्रीच्या मॉलच्या धर्तीवर नाशिक शहरात शेतकर्‍यांच्या सहभागातून शेतातील ताजा व उत्तम प्रतिचा शेतमाल नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने नाशिक फार्मर्स मार्केटची स्थापना करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात शेतकर्‍यांना आपला शेतमाल मिळेल त्या जागेत विकावा लागला. अनेकदा शेतकर्‍यांना ग्राहक न मिळाल्याने त्यांची मोठी हेळसांड झाली होती. उत्तम प्रतिचा शेतमाल असुनही त्यांना ग्राहक न मिळाल्याचे नुकसान झाले होते. यादरम्यान शेतकरी व व्यावसायिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने नाशिक फार्मर्स मार्केट समोर आले आहे.

याठिकाणी पहिल्या टप्प्यात या मार्केट मध्ये ठराविक आकाराचे 70 भाजीपाला व फळांचे गाळे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. नाशिक मधील पहिले भाजीपाला व फळांचे बंदीस्त मार्केटचा शुभारंभ औपचारिक रित्या आज झाला आहे. सोशल डिस्टसिंग पाळत आणि वैयक्तीक स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली असुन याठिकाणी येणार्‍या ग्राहकांसाठी प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिक शहराचे माजी महापौर प्रकाश मते यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभा राहिला असुन माजी नगरसेवक विक्रांत मते यांनी हा प्रकल्प नंदनवन लॉन्सच्या मागील भागातील मंगल कार्यालयात सुरू केला आहे.

आज सुरू झालेल्या मार्केटचा नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकाच स्टॉलवर दीडशे रुपयांचा माल विकत घेतल्यास 1 रुपयांत 1 किलो साखर देण्यात येत असुन या ऑफरने लक्ष वेधून घेतले आहे.

मार्केटच्या माध्यमातून नवे व्यासपीठ

तरुण शेतकरी व व्यावसायिक अशा 150 व्यक्तींना एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणुन अत्याधुनिक मॉलच्या धर्तीवर हे मार्केट सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद व शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेता भविष्यात भाजीपाला आणि फळे यांची स्वतंत्र विभाग करण्याचे नियोजन आहे. नाशिककरांना ताजा, उत्तम प्रतिचा व गुणवत्तेचा माल उपलब्ध करुन देण्यासाठी भविष्यात प्रयत्न राहणार असल्याची माहिती संचालक विक्रांत मते यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या