Friday, May 3, 2024
Homeनगरसततच्या पावसाने रोगाचा प्रादूर्भाव वाढला- डॉ. लटके

सततच्या पावसाने रोगाचा प्रादूर्भाव वाढला- डॉ. लटके

माहेगाव |वार्ताहर| Mahegav

उसावरील तपकिरी ठिपके व तांभेरा रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै ते डिसेंबर या कालावधीत आढळून येतो.

- Advertisement -

यावर्षी सततच्या पावसाने वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने या रोगाचा प्रादूर्भाव वाढला असल्याचे राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुदर्शन लटके यांनी खुडसरगाव येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, ऊस पिकाचे सर्वेक्षण करून रोगाची लक्षणे तीव्रता व पिकाची अवस्था पाहून शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी. 86032 सारख्या रोगप्रतिकारक्षम जाती निवडून त्यांची लागवड करावी.

नत्राची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. पावसाळ्यात उसात जास्त दिवस पाणी साचून देऊ नये. रोगग्रस्त झालेली पाने बाहेर काढून नष्ट करावी. सामूहिक पध्दतीने रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांंचा अवलंब करावा, असे सांगितले.

यावेळी मंडल कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, राहुल ढगे, कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर, तुळशीराम पवार, कैलास मकासरे, शिवप्रसाद कोहकडे, कृषी सहाय्यक भारत कातोरे, सुनील म्हस्के, मोहन गोसावी, अर्जुन पवार, सचिन पवार, आबासाहेब पवार, रवींद्र जाधव, राहुल पवार, सुनील पवार, राजेश बडाख आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ऊस पिकावर सततच्या पावसामुळे जास्त आर्द्रतायुक्त वातावरणामुळे तपकिरी ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅकोझेंब 3 ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड 3 ग्रॅम प्रतिलिटर यापैकी एका औषधांची फवारणी करावी, रोगट वाळलेली पाने काढून नष्ट करावी.

– डॉ विवेक शिंदे, रोगशास्त्रज्ञ, म.फु.कृ.वि. राहुरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या