Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधभाग्यवान नेताजी नितीशकुमार !

भाग्यवान नेताजी नितीशकुमार !

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

नितीश कुमार यांच्या हातावरील ग्रहरेषा ते भाग्य घेऊन नितीशकुमार जन्माला आले ते दाखवितात. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे हातावरील रेषा अतिशय भाग्यकारक आहेत. अश्या व्यक्ती अतिशय…

- Advertisement -

उच्च पदाला पोहोचतात, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मन सन्मान यानं प्राप्त होतो. यांच्या छोट्याशा प्रयत्नाला सुद्धा भाग्य साथ देत असते.

एक कुशल राजकारणी, कुठल्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न अडकलेला, अतिशय उत्साही, जनमानसाचा व राजकीय कल पाहून बुद्धिबळाच्या पटावरील डावाप्रमाणे चाल खेळणारा असा हा बुद्धिवान नेता.

जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, व्ही पी. सिंग यांच्या राजकीय व सामाजिक चळवळीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे.

बिहार राज्याला सुशिक्षित करण्यात विषेतः महिला वर्गाला सुशिक्षित करण्यात ते सर्वात पुढे होते. सध्या ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

नं 1 च्या बाणाने दाखविलेली हृदय रेषा आहे, ती कमानदार व गुरु उंचवट्यापर्यंत गेलेली आहे. गुरु ग्रहाचे शुभ कारकत्व त्यांना बहाल झाले आहे, त्यामध्ये ज्ञान, महत्वाकांक्षा, नेतृत्व, संधीचे सोने करणारा, समाजकारणात कायम पुढे व राजकीय पटलावरचा अंदाज घेऊन राजकारणात यशस्वी होणारा.

नं 2 च्या बाणाने दाखविलेली मस्तक रेषा आहे, आयुष्य रेषा व तिच्यात मोठे अंतर आहे असे लोक अत्यंत हुशार, आपला स्वार्थ साधणारे, कुशल नेतृत्व व आपल्या कामामध्ये शिस्त व प्रशासनालासुद्धा शिस्त लावून काम करून घेण्याचे कसब लाभले आहे.

नं 3 च्या बाणाने दाखविलेली आयुष्य रेषा आहे, अतिशय सुदृढ व शुक्र ग्रहाला घेरा घालणारी हातावर मनगटापर्यंत गेलेली आयुष्य मान योगाची व आरोग्य संपदा लाभलेली आयुष्य आहे.

नं 4 च्या बाणाने दाखविलेली मंगळ रेषा आहे. ही रेषा त्या व्यक्तीला काम करण्याची अधिक ऊर्जा देते, अश्या व्यक्ती लवकर थकत नाहीत, मंगळ रेषा अखंड असल्याने अठरा अठरा तास काम करू शकतात. उत्साही तसेच कडक शिस्तीचे व पटकन राग येणार्‍या व्यक्ती असतात.

नं 5 च्या बाणाने दाखविलेले अंगठ्यावरील यवाच, गव्हाच्या आकाराचे चिन्ह आहे, ह्या चिन्हामुळे अशा व्यक्तींना ऐश्वर्य प्राप्त होते.

नं 9 च्या बाणाने दाखविलेली मस्तकरेषा आहे, मस्तकरेषा चंद्र ग्रहावर मधोमध खाली उतरलेली आहे, असे लोक आराखडे तयार करण्यात तरबेज असतात, यांच्या कल्पना व कल्पनाविलास हा खूप उत्तम दर्जाचा असतो तसेच माणसे ओळखण्यात हे लोक तरबेज असतात. ज्यांच्याकडून फायदा आहे अशा व्यक्तीवर विश्वास ठेऊन यशस्वी होतात, यांच्यात मोठी कल्पकता असते.

नितीशकुमार यांना भाग्य रेषा, रवी रेषा व बुध रेषेने भाग्यवान बनविले आहे, परंतु वैवाहिक सुख त्यांच्या नशिबात हवे तेव्हढे नसावे. विवाह रेषेत दोष आहे परंतु अशा व्यक्तिगत विषयात बाबत न लिहिलेले बरे त्या- मुळे त्या रेषेचा उल्लेख टाळला आहे.

नितीशकुमार यांना भाग्यरेषा, रवीरेषा व बुधरेषेने भाग्यवान बनविले आहे

नं 6,7,8,10 व 11 च्या बाणाने दाखविलेली रेषा अनुक्रमे 6 नंबरची रेषा भाग्य रेषा आहे, ही मनगटापासून उगम पावून

निर्दोषपणे शनी उंचवट्यावर जात आहे व एकच अखंड व लांब आहे. ही अतिशय भाग्यकारक रेषा आहे, ही रेषा आयुष्यात आर्थिक संपन्नता देते व व्यक्तीस यशस्वी करते.

7 नंबरची आयुष्य रेषा निर्दोष लांबपर्यंत असल्याने आरोग्याच्या तक्रारी नाहीत, जुने आजार, रोग नाहीत.

तसेच 8 व 10 नंबरच्या बाणाने दाखविलेली अनुक्रमे बुध व रवी रेषा आहे, यांचे वैशिटय म्हणजे ह्या दोन्ही रेषा भाग्य रेषेतून उगम पावत असल्याने अतिशय शुभ व भाग्यकारक आहेत.

बुध व रवी रेषेचा उगम भाग्य रेषेतून होत असल्याने असे लोक जन्मतःच भाग्य घेऊन जन्माला आलेले असते, रवी रेषा यश देते व हीच रवी रेषा 11 नंबरच्या बाणाने दाखविलेली रवी व बुधाच्या बोटांच्या मधे गेल्याने, जागतिक मान सन्मान व कीर्ती लाभते.

भाग्य रेषेतून बुध रेषा व रवी रेषेचा उगम तसेच भाग्यरेषासुद्धा अतिशय शुभ असा त्रिवेणी भाग्यशाली संगम अतिशय दुर्मिळ आहे. तीन भाग्यकारक रेषा एकत्र व त्याही अतिशय उच्च प्रतीच्या पाहावयास मिळत नाहीत आणि मिळणारही नाहीत आणि म्हणूच नेताजी नितीशकुमार हे अतिशय भाग्यवान आहेत भाग्य घेऊनच जन्माला आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या