Monday, May 6, 2024
Homeनगरखंडोबा मंदिराच्या दानपेटीची चोरी; गुन्हा दाखल

खंडोबा मंदिराच्या दानपेटीची चोरी; गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिराच्या दानपेटीची चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सुभाष भगवान काळे (वय 44) धंदा-शेती रा. वाकडी ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आमचे गावात गोयगव्हाण रोडला गावकर्‍यांनी लोकवर्गणी करुन सन -2015 मध्ये खंडोबा मंदिर बांधले आहे. तेंव्हापासून मी मंदीराचे व्यवस्थापन पाहत आहे.

मंदीराच्या आतमध्ये वर्गणी करीता दानपेटी ठेवण्यात आलेली आहे. दानपेटी ही अंदाजे चार ते पाच महीण्याला उघडली जाते. तीन ते चार महीण्यात दोन पेटी मध्ये दहा ते पंधरा हजर दान जमा होत असते. सध्या लॉकडाउन असलेने सुमारे आठ महीण्यापासुन मंदीरातील दानपेटी उघडण्यात आलेली नाही.

4 सप्टेंबर रोजी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून दानपेटी चोरीस गेल्याचे दिसून आले. दान पेटीची चोरी झाल्या पासुन आज पावेतो आम्ही चोरी बाबत माहिती घेतली असता सदरची चोरी ही महेश सदाशिव काळे, कृष्णा जर्नादन गोरे ज्ञानेश्वर रतन वडागळे सर्व रा. वाकडी यांनी केली असावी असा आमचा संशय असलेने त्यांना आम्ही गावकर्‍यांनी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला हजर केले आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या