Sunday, May 5, 2024
Homeनाशिकसिन्नर : अखेर 'तो' कोंबडी चोर पोलिसांच्या ताब्यात

सिन्नर : अखेर ‘तो’ कोंबडी चोर पोलिसांच्या ताब्यात

वावी । Wavi

नांदूरशिंगोटेजवळ कोबंड्या घेऊन जाणारी पिक अप अडवून त्यातील सहाशे कोंबड्या चोरणार्‍यांना वावी पोलीसांनी…

- Advertisement -

पकडले असून या चोरीतला मुख्य सुत्रधारही पोलीसांनी आज (दि.७) जेरबंद केला.

रांजणगाव येथील शेतकरी अण्णासाहेब खालकर या शेतकर्‍याचे 600 पक्षी घेऊन पिकअप क्र. एम.एच. 04/ जे. के. 8448 सह चालक व त्याचा मित्र हे शुक्रवारी (दि.४) रात्री ११ वाजेच्या सुमारास निमोण-नांदूर रस्त्याने जात असताना अज्ञात मोटारसायकल स्वारांनी पिकअप अडवली होती.

त्यानंतर चाकूचा धाक दाखवून वाहन चालक व त्याच्या साथीदाराच्या डोळ्याला पट्टी बांधून या चोरट्यांनी चालकासह अज्ञात स्थळी नेऊन कोंबड्या उतरवून घेतल्या होत्या व त्यानंतर पिकअपसह चालक व त्याच्या मित्राला सोडून दिले होते.

पिकअपला असणार्‍या जी.पी. एस. प्रणालीमुळे चोरट्यांनी कोंबड्या पांगरी शिवारात रवी शिरसाठ यांच्या पोल्ट्री फार्मवर खाली केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून उपअधीक्षक माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी तात्काळ सापळा रचून शिरसाठला ताब्यात घेतले.

त्याची उलट तपासणी केल्यानंतर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार भैया उर्फ प्रवीण कांदळकर व अन्य तिघांची नावे त्याने दिल्याचे समजते.

त्यावरुन पोलीसांनी प्रविण कांदळकर यांच्यासह आकाश सुर्यभान शिंदे (२५), रवींद्र गोरख शिरसाठ (२५) यांना ताब्यात घेतले असून या गुन्ह्यातील दोन मोटार सायकलींसह अन्य तिघांचा तपास वावी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या