Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : नाशकात कॉंग्रेसचे 'रोजगार दो' आंदोलन

Video : नाशकात कॉंग्रेसचे ‘रोजगार दो’ आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी

केंद्रातील मोदी सरकारने कोट्यावधी युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न दाखवले होते. मात्र, या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे. त्यांची पंतप्रधान मोदी यांना आठवण करुन देण्यासाठी युवक काॅग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी (दि.१०) रोजगार दो मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर दरवर्षी तरुणांना मोठया संख्येने रोजगार उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र सद्यस्थितीत देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून करोना परिस्थिती व्यवस्थित न हाताळल्याने लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून आत्मनिर्भर भारत व अनेक घोषणा करण्यात आला.

मात्र सर्व घोषणा हवेत असून प्रत्यक्ष बेरोजगारीची समस्या हाताबाहेर जात असून युवकांमध्ये प्रचंड संताप आहे. सरकार खोट्या भूलथापा देत असल्याचा आरोप यावेळी काॅग्रेसकडून करण्यात आला. यावेळी मोदी सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी पक्षाच्या डाॅक्टर, इंजिनिअर, उद्योजक व इतर सेलच्या पदाधिकारी उपस्थित होते. शहराध्यक्ष शरद आहेर, महिला शहराध्यक्ष वत्सला खैरे, नगरसेविका डाॅ. हेमलता पाटिल, राहुल दिवे व युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटिल आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या