Monday, May 6, 2024
Homeनगरदुचाकी चोरीमुळे नगरकर त्रस्त; पोलिसांचे दुर्लक्ष

दुचाकी चोरीमुळे नगरकर त्रस्त; पोलिसांचे दुर्लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर व परिसरातून दुचाकी बरोबरच चारचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.

- Advertisement -

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून एक चारचाकी व एक दुचाकी चोरीला गेली. तर भिंगार कॅम्प, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी मंगळवारी (दि. 8) संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना चिंचेती बाब झाली आहे. मात्र पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर तपास लागत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

निर्मलनगर रोडवरील शिरसाठ मळ्यातून चोरट्यांनी कार (क्र. एमएच 16 बीवाय 3622) लंपास केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कारचे मालक ओमकार व्यंकटेश कुलकर्णी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी त्यांची कार घरासमोर लॉक करून पार्क केली होती. रात्रीतून कारची चोरी झाल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सावेडीच्या कॉटेज कार्नर परिसरातून मनोज सुरेश शिंदे (वय 26 रा. सोनगाव सात्रळ ता. राहुरी) यांची दुचाकी (क्र. एमएच 17 सीके 1009) चोरीला गेली. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री घडली. शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

स्टेट बँक चौकातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. सोमवारी (दि. 7) दुपारी एक वाजता स्वप्नील शंकर दिवाणे (वय 33 रा. दिल्लीगेट, नगर) यांची दुचाकी (क्र. एमएच 16 बीटी 1399) स्टेट बँक चौकातून चोरीला गेली. याप्रकरणी दिवाणे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील बस स्थानकावरून आकाश विलास राठोड (वय 20 रा. वाळुंज ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यांची दुचाकी (क्र. एमएच 20 डीवाय 4137) चोरीला गेली. ही घटना 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी राठोड यांनी मंगळवारी (दि. 8) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या