Monday, May 6, 2024
Homeराजकीयपावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या : सौ. कोल्हे

पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या : सौ. कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Ahmednagar

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पोहेगाव आणि परिसरातील गावांमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ. स्नहेलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, महसूलमंत्री आणि पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मतदार संघातील पोहेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापूर, सोनेवाडी, चांदेकसारे, घारी आदी गावांमध्ये दिनांक 10 सप्टेंबर रोजी वादळी वार्‍याचा व मुसळधार पावसाचा तडाखा बसला.

त्यामुळे या गावातील शेतातील उभी पिके ऊस, मका, कपाशी, कांदा रोपे, बाजरी, सोयाबीन, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पावसाच्या तडाख्यामुळे उभी असलेली पीके भुईसपाट झाली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले, विद्युत पोलच्या तारा तुटून मोठे नुकसान झाले.

यापुर्वीही या भागावर नैसर्गिक आपत्ती येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, या संकटातून सावरत असतानाच पुन्हा या भागातील शेतकर्‍यांवर पुन्हा नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. यासाठी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे.

सध्याच्या करोना परिस्थितीमुळे शेतकर्‍यांवर मोठे आर्थीक संकट आले आहे, त्यामुळे उदरनिर्वाहाबरोबर अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहे, याही परिस्थितीत शेतीची मशागत करून पिके उभे करण्याची मोठी कसरत शेतकर्‍यांनी करावी लागली.

पिके शेतात उभी असल्याने थोडयाच दिवसांत धान्याची रास घरात येणार असतानाच वादळी वारा व अतिपावसामुळे शेतकर्‍यांचे स्वप्नच उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे केवळ पंचनामे करून चालढकल करण्यापेक्षा तातडीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाल्यास शेतकर्‍यांना या संकटात दिलासा मिळेल. त्यामुळे या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या