Thursday, May 2, 2024
Homeजळगाव781 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

781 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राज्य शासनाने काढलेल्या आदेशाप्रमाणे मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 781 ग्रामपंचायतींवर प्रशासनातर्फे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या सरपंचांची मुदत संपल्यानंतरदेखील निवडणूक घेणे शक्य नसल्यामुळे अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा अध्यादेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला होता त्याची अंमलबजावणी करीत जिल्ह्यातील 781 ग्रामपंचायतींवर प्रशासनातर्फे प्रशासकीची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यात अमळनेर तालुक्यातील 67, भडगाव तालुक्यातील 33, भुसावळ तालुक्यातील 26, बोदवड तालुक्यातील 29, चाळीसगाव तालुक्यातील 76, चोपडा तालुक्यातील 52, धरणगाव तालुक्यातील 47, एरंडोल तालुक्यातील 37, जळगाव तालुक्यातील 43, जामनेर तालुक्यातील 73, मुक्ताईनगर तालुक्यातील 51, पाचोरा तालुक्यातील 96, पारोळा तालुक्यातील 58, रावेर तालुक्यातील 46 व यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या