Monday, May 6, 2024
Homeनगरवांबोरी चारीच्या पाण्याने करडवाडी, शिरापूरचे बंधारे ओव्हरफ्लो

वांबोरी चारीच्या पाण्याने करडवाडी, शिरापूरचे बंधारे ओव्हरफ्लो

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी, राहुरी, नगर, नेवासा तालुक्यातील 45 गावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वांबोरी चारीला नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशाने

- Advertisement -

मुळा धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील या योजनेतील शेवटच्या टप्प्यातील गावे म्हणून ओळख असलेल्या करडवाडी, शिरापूर येथील बंधारे या चारीच्या पाण्याने अक्षरशः तुडूंब भरून ओसंडून वाहू लागल्याने या भागातील शेतकर्‍यांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

यावर्षी घाटशिरस, देवराई, सातवड, तिसगाव, शिरापूर या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागातील अनेक पाझर तलाव, साठवण बंधारे पाण्याअभावी कोरडेठाक राहिले आहेत त्यामुळे या भागातील अनेक शेतकर्‍यांनी व कार्यकर्त्यांनी या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी ना. तनपुरे यांच्याकडे मुळा धरण ओव्हरफ्लो होताच वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुळाधरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर तनपुरे यांनी मुळा पाटबंधारे विभागाला वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे आदेश दिले.

शेवटच्या टोकाच्या गावांना प्राधान्याने पाणी पोहोचवण्याच्या सूचना ना.तनपुरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. त्यानंतर घाटशिरस, शिरापूर, करडवाडी, मढी, तिसगाव या भागातील पाझर तलाव, बंधारे पाण्याने भरून देण्यासाठी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील,

शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी या संपूर्ण लाभधारक परिसराची पहाणी केल्यामुळे करडवाडी येथील पाच, शिरापूर येथील तीन बंधारे पाण्याने भरले असून उर्वरीत दोन बंधारे दोन दिवसांत भरून चौथ्या दिवशी पाणी तिसगावच्या हद्दीत पोहोचणार असल्याचा विश्वास शाखा अभियंता आंधळे यांनी प्रत्यक्ष भेटीप्रसंगी व्यक्त केला आहे. यावेळी शेतकरी नितीन शिंदे, विकास जाधव, कैलास गर्जे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या