Monday, May 6, 2024
Homeनगरअसंघटीत बांधकाम कामगारांची ऑफलाइन नोंदणीसाठी उपोषण

असंघटीत बांधकाम कामगारांची ऑफलाइन नोंदणीसाठी उपोषण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

असंघटीत बांधकाम कामगारांना कोरोनाच्या संकटकाळात शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत, घरकुल, मुलांना शिष्यवृत्ती व इतर लाभ मिळण्यासाठी कामगारांची नोंदणी व नूतनीकरण

- Advertisement -

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या मागणीसाठी बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.

या उपोषणात प्रदेश सचिव उमाशंकर यादव, जिल्हाध्यक्ष शंकर भैलुमे, आनंद कांबळे, सतीश तांदळे, सचिन होशी, महेंद्र गजरमल, संजय डहाणे, आजिनाथ जाधव, संतोष पवार, किरण लष्कर, मनोज चौगुले, राजू लष्कर, बापू माने, दत्ता सोनवणे, संतोष जाधव आदि बांधकाम कामगार सहभागी झाले होते.

जिल्ह्यात बांधकाम व इतर तत्सम असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. यापैकी काही थोड्या प्रमाणात कामगारांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत झालेली आहे.

मात्र अनेक कामगार अशिक्षित व असंघटित असल्याने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य न मिळाल्याने ते नोंदणीपासून वंचित राहिले आहे.

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात कामगार नोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर ते अशिक्षीत असल्याने त्यांना अनेक प्रकारे कागदोपत्री प्रश्न विचारून त्रास दिला जात आहे. यामुळे अनेक कामगार नोंदणी करण्यापासून वंचित राहिले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

असंघटीत बांधकाम कामगारांना कोरोनाच्या संकटकाळात शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत, घरकुल, मुलांना शिष्यवृत्ती व इतर लाभ मिळण्यासाठी कामगारांची नोंदणी व नूतनीकरण सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून ऑफलाइन पद्धतीने करुन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या