Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

मालेगाव। प्रतिनिधी Malegaon

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमा होवून झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी दिले.

तालुक्यातील पाटणे, आधार खु, चिंचावड परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा, मका, भेंडी, डाळिंब व ऊस पिकांची कृषी मंत्री भुसे यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. झालेल्या नुकसानीची पाहणी करतेवेळी उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे,कृषी व महसुल विभागाचे अधिकारी कर्मचारी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सततधार पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांना भेटी देत तेथील कांदा, मका, भेंडी, डाळिंब, ऊस आदि पिकांची प्रत्यक्ष शेतात जावून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी मंत्री श्री.भुसे यांनी केली. यात पाटणे येथील रामदास बुधा तांबे यांची भेंडी व डाळींब पिके, शेखर थोरात, आधार खु. यांची मका आणि चिचावड येथील कारभारी गांगुर्डे यांचे मका, ऊस आदि पिकांची पाहणी यावेळी केली, झालेल्या नुकसानीसह तालुक्यात ज्या ठिकाणी सततधार पावसामुळे नुकसान झाले आहे त्या कृषी क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करुन शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

याबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगामात पिक विमा काढला त्यांनी तात्काळ में.भारती अॅक्सा जनरल इन्शुरंस कंपनी लि. यांचे टोल फ्री क्र. 1800-103-7712 तसेच ईमेल [email protected] व digvijay.kapse@bhartiaxacom याव्दारे कंपनीला इंटीमेशन (सुचना) कराव्यात आणि शासनाने विकसीत केलेल्या मोबाईल क्रॉप इन्शुरंस अॅपवरुन शेतीपिकाचे झालेल्या नुकसानीची माहिती फोटोसह अपलोड करण्याच्या शेतकऱ्यांसह कृषी व महसुल प्रशासनास त्यांनी यावेळी दिल्या.

तालुक्यात झालेल्या नुकसानीची पहाणी करतेवेळी तालुक्यातील शेतकरी तारकचंद रामदास तांबे, संतोष शांताराम शेवाळे, चंद्रकांत जिभाऊ अहिरे, तुकाराम देवचंद बागुल, स्वप्नील कारभारी पवार, देवाजी भाऊराव पवार, कोमल महादु वाघ, दौलत जयराम मोरे, शेखर गोविंद थोरात, दगडु किसान ठोके, दत्तु किसान थोरात, कारभारी रघुनाथ गांगुर्डे, वाल्मीक बाळासाहेब खैरनार, भाऊसाहेब दामु चव्हाण, मन्साराम दामु जाधव, दिपक तारंकचंद बोरसे, बाळु दोधा सुर्यवंशी आदि शेतकरी उपस्थित होते

- Advertisment -

ताज्या बातम्या