Wednesday, May 8, 2024
Homeनगरपुरातन वाड्याच्या भिंतीत सापडले नाणे व चांदीचे शिक्के

पुरातन वाड्याच्या भिंतीत सापडले नाणे व चांदीचे शिक्के

कळस |वार्ताहर| Kalas

अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक गावातील तान्हाबाई लक्ष्मण वाकचौरे यांच्या जुनाट वाड्यातील घरात एक अचंबित घटना घडली.

- Advertisement -

धो-धो पावसामुळे त्यांच्या जुन्या वाड्याच्या भिंतीला तडा गेला. तशा जुन्या वाड्याच्या भिंती म्हणजे एक एक खणाच्या पण वरील बाजूस छप्पर नसल्यामुळे ही भिंत भिजून पडली आणि भिंतीच्या आतून एक जुनाट मातीचे गाडगे घरंगळत बाजुला आले. पहिल्यांदा त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर त्यातून एक ईस्ट इंडिया कंपनीचे 1845 चे एक आण्याचे नाणे बाहेर पडले.

त्यानंतर ते गाडगे बघितले तर त्यात 1845 ते 1900 साला पर्यंत एक आणा व अनेक पैसे सापडले. यात चांदीचेही नाणे सापडले. हे नाणे सापडल्यानंतर तान्हाबाईचे सुपुत्र माजी ग्रा. पं.सदस्य रावसाहेब वाकचौरे यांनी पोलीस पाटील गोपिनाथ ढगे, ईश्वर वाकचौरे, राजेंद्र गंवादे, गणेश रेवगडे यांना बोलवून सदर घटनेची माहिती दिली.

त्यानंतर लगेचच चांदीचे नाणे सोनाराकडे तपासणीसाठी पाठवून खात्री करण्यात आली. अशा प्रकारे कळस बुद्रुक येथे जुनाट वाडे हे कळस येथील मानाचे आणि गौरवाचे प्रतिक आहे. पण सध्या अनेक वर्षांचे वाडे झाल्यामुळे त्यात असणार्‍या जुन्या आठवणी सापडत आहेत.एकूण जवळपास 50-60 नाने यामध्ये सापडले आहेत. यामध्ये बाहेरील देशातील नाण्यांचा देखील समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या